आभाळअंकुर - नयना निगळ्ये

Parent Category: मराठी साहित्य Category: कविता Written by सौ. शुभांगी रानडे

काजळल्या पापणीत
सारं आभाळ दाटलं
कसा आवरू ओथंब
काळ्या नभाला वाटलं
-
आसवांना नाही खळ
इलुसाही नाही वळ
काळजात भळाळली
काळीनिळी खोल कळ
-
रितं भरलेलं डोळं
असं तुझं लागं खुळ
काळ्या काजळात रुजे
आकाशाचं पाळमूळ
-
चिंब चिंब ओले थेंब
धुळीं भेटण्या व्याकुळ
लाख लाख मोहरले
काळे आभाळअंकुर
- नयना निगळ्ये २८ ऑगस्ट २०२१
©️Nayana Niglye

Hits: 348
X

Right Click

No right click