अशब्द - नयना निगळ्ये

Parent Category: मराठी साहित्य Category: कविता Written by सौ. शुभांगी रानडे

शब्द सांडला नाही
अर्थ आटला नाही
अव्यक्त धुक्याच्या ठायी
मौनातच विरले काही
-
नदी तटस्थ ओसरलेली
रस्ता वहात राही
भर पावसात पागोळी
भरली पण झरली नाही
-
निळे कोरडे मेघ
खोल निळीशी ओल
वाराही अशब्द वाही
तसाच विरला बोल
-
निळे स्वच्छ आकाश
की अंधाराचे मौन
उबदार मिठी मध्येही
का थंड जागते रान
-
गवसून नूर अन सूरही
पूर इच्छांचा सुकाच राही
भिजवाया कागद काही
ओघळली काळी शाई
- नयना निगळ्ये 11/4/2021
©️Nayana Niglye

Hits: 360
X

Right Click

No right click