नवा श्वास - नयना निगळ्ये

Parent Category: मराठी साहित्य Category: कविता Written by सौ. शुभांगी रानडे

कधी मारवा हि मेघमल्हार गातो
नादते मंद सनई कधी चौघडे
प्रितीला मितीच्या रिती काय लावू
जिते का रितेची भावनांचे घडे
-
सुखाच्या उरी आकांत दाटताना
अंधार गिळतो निखळत्या सावल्या
निष्पर्ण तरूही वसंतात फुलती
आशा कितीक हृदयी झंकारल्या
-
जिथे मावळे सूर्य अस्ताचलाला
दिवेलागणीचे क्षितीजीं दिवे
मनाच्या कडेला पुन्हा झेप घेती
किती आठवांचे थवेच्या थवे
-
पुन्हा भास होतो पुन्हा त्रास होतो
पुन्हा श्रावणाचा कि मधुमास येतो
पुन्हा श्वास माझा नवा ध्यास होतो
नवा ध्यास पुन्हा नवी आस होतो
-
नवी आस तेव्हा नवा श्वास होतो
नवा श्वास होतो नवा श्वास होतो
- नयना निगळ्ये ऑक्टोबर २४, २०२१

Hits: 379
X

Right Click

No right click