लक्ष्मी पूजन....श्रीराम कानिटकर

Parent Category: मराठी साहित्य Category: कविता Written by सौ. शुभांगी रानडे

जय इंदिरे, विमलेश्र्वरी
हरिवल्लभे, कृपा करी

कमलापरी कांती तुझी,
मुख रम्य, कायम तुष्टता
प्रगटे तुझ्या हातातुनी
सार्‍या जगाची सार्थता
तुझिया दयेचा चांदवा
नित राहू दे माथ्यावरी

ध्यानीमनी स्मरता तुझी
सुखदा निरामय संपुटी
सृष्टीच जन्मा ये नवी
जमता कृतींच्या पद्धती
कल्पक संशोधन करी
सुखवून जाती बावरी

....श्रीराम कानिटकर
लक्ष्मी पूजन
४/११/२०२१

Hits: 384
X

Right Click

No right click