बाळराजाचे दोस्त

Parent Category: मराठी पुस्तके Category: सय कवितासंग्रह

आली बघ चिऊताई । अंगणात दारापुढे ।
बाळराज खेळताना । मोतियांचा सडा पडे ॥१॥

आली बघ खारूताई । तुरूतुरू ती पळत ।
बाळराजाच्या गालात । गोड खळी ती पडत ॥२॥

आली बघ मनीमाऊ । सदा म्हणे म्याऊ म्याऊ ।
बाळराजाचा गे खाऊ । चला थोडा तिला देऊ ॥३॥

आला बघ पोपटभाऊ । विठूनामाचा गजर ।
बाळराजाची नजर । खिळलेली त्याचेवर ॥४॥

आले बघ कुत्रोपंत । शेपटी ती हालवीत ।
बाळराजासी पाहात । प्रेमे उभे ते दारात ॥५॥

बाळराजाचे हे दोस्त । येती दाराखिडकीत ।
पाहता त्या दिनरात । बाळ खूष हो मनात ॥६॥

Hits: 324
X

Right Click

No right click