लंडन कॉलेज ऑफ कॉमर्स

Parent Category: मराठी पुस्तके Category: शंकरराव किर्लोस्कर - पुस्तक

लंडनच्या कॉलेज ऑफ कॉमर्स येथे शिकण्यासाठी शंकरभाऊंना इंग्लंडला जाण्यासही कंपनीने संमती दिली.

शंकरभाऊच्या मनात विक्रयशास्त्र आणि व्यावसायिक संघटना यांचे शास्त्रोक्त शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला जाण्याचा विचार घोळत होता. त्यांनी सहा-सात वर्षात
ऑफिसच्या व्यवस्थेपासून वाडीतल्या सामाजिक जीवनात खेळापासून संरक्षण व्यवस्थेपर्यंत बरीच कामे केली होती. धंद्याचे आधुनिक शास्त्र व तंत्र यांची पुस्तके
त्यांनी वाचली होती; पण गुरुमुखातून मिळालेल्या ज्ञानाची सर पुस्तकी ज्ञानाला नसते, म्हणून 'किलोस्कर खबर' चा ५० वा अंक प्रकाशित करून शंकरभाऊ
व्यावसायिक व्यवस्थापन आणि विक्रीकला यांच्या शास्त्रोक्त शिक्षणासाठी इंग्लंडला गेले.

२० मार्च १९२४ ला मुंबई बंदरात उभ्या राहिलेल्या सिटी ऑफ जिनोआ या बोटीवर शंकरभाऊ भारावलेल्या मनाने चढले. निरोप देण्यास बरीच मंडळी आली
होती. भोंगा झाला. धक्क्यापासून बोट दूर होऊ लागली. पार्वतीबाईच्या कडेवर ६ महिन्याची मालती होती आणि तीन वर्षाच्या मुकुंदाने आईचे बोट धरले होते.
त्यांच्याकडे पाहताना शंकरभाऊंच्या डोळ्यात पाणी भरले. त्यामुळे क्षणभर त्यांना काही दिसेनासे झाले.

मुंबईचा किनारा सोडल्यावर समुद्रातील प्रवासात डेकवर बसले की वरती आकाश व खाली पाणी दिसे. वारा नसला तर समुद्र शांत काचेसारखा वाटे आणि
डोंगराएवढ्या लाटा येऊ लागल्या की समुद्र भयानक अवतार धारण करी. प्रवासाच्या २५ दिवसांत पाश्चात्य पद्धतीचे जेवण व शिष्टाचार अंगवळणी पडले, त्यामुळे इंग्लंडला पोचल्यावर आपली सोय लागेल असा विश्वास शंकरभाऊंना आला.

प्लिमथ बंदरावरून लंडनला पोचेपर्यंत तेथील गोऱ्या पोलिसांनी ते प्रथमच येत आहेत हे ओळखून-इंडियन होस्टेलमध्ये पोचेपर्यंत त्यांची तत्परतेने व्यवस्था केली.
लंडनचे पोलीस कर्तव्यदक्ष म्हणून त्यांची जगभर ख्याती आहे. ती खरीच याचा प्रत्यय आला. दुसर्‍या दिवशी 'लंडन कॉलेज ऑफ कॉमर्स' मध्ये जाऊन शंकरभाऊ प्रिन्सिपॉल अँटवुड यांना भेटले तेव्हा त्यांनी शंकरभाऊंच्या हिंदुस्थानातील कामाची माहिती विचारली. ती समजल्यावर ते म्हणाले, ''तुम्ही अनुभवाने व स्वत:च्या प्रयत्नाने विक्रयशास्त्राचे तंत्र बरेचसे जाणता आहात. तेव्हा इथल्या तुमच्या वेळेचा व पैशाचा रास्त उपयोग होण्यासाठी तुम्हाला अधिक शास्त्रोक्त ज्ञान आवश्यक आहे, अशा प्रकारचा कोर्स आखून देतो.''

संघटनाशास्त्र व व्यवस्था, विक्रयशास्त्र व कला यात मानसशास्त्राचा भाग असतोच. अशा विषयांचे रीतसर शिक्षण सुरू झाले. आठवड्यातून एक दिवस प्रात्यक्षिके करून शंकानिरसन होत असे. प्रसिद्धी हा धंद्याचा प्राण, तुमच्या मालाचे नाव बहुजन समाजाला माहीत झाले पाहिजे. त्यासाठी जाहिराती करण्याची अनेक साधने कशी याचे शेकडो नमुने, कल्पना आणि वस्तू यांचा विचार होऊ लागला. ''संस्थेचे व्यवस्थापन'' म्हणजे नेमलेल्या अनेक माणसांना संस्थेचे धोरण व कार्यपद्धती शिकविणे, प्रत्येकास त्याची जबाबदारी व अधिकार यांच्या वापराची स्पष्ट कल्पना देऊन मदतनिसांचे कर्तव्य ब स्थान त्यांना समजावले पाहिजे.

तिरसटपणा, अरेरावी, भेकड किंवा क्षुद्र स्वभाव हे व्यवस्थापनात वर्ज्य आहेत. हाताखालच्या माणसांकडून योग्य प्रमाणात योग्य प्रतीचे काम करवून घेता येणे फारसे अवघड नाही. त्या सहकारी माणसांबद्दल सहानुभूती, गुणग्राहकता व उत्तेजन याने जे काम होते ते हुकूम सोडण्याने होत नाही. प्रत्येकाच्या मनात एक मोठी शक्‍ती असते. तिचा उपयोग योग्य दिशेने केला, तरच यश, सुख व समाधान मिळते हे लक्षात ठेवले पाहिजे! असे विचार पुन: पुन्हा पटवले जात. लंडनच्या मुक्कामात वेंब्ले येथे ब्रिटिश साप्राज्यातील सर्व देशांच्या मालांचे अजख प्रदर्शन भरले होते. शेतकी विभागात आपला किर्लोस्कर नांगर पाहून शंकरभाऊंना फार आश्चर्य वाटले.

लंडनच्या सभोवतालची प्रेक्षणीय स्थळे पाहताना त्यांना खूपच मराठी मंडळी भेटत होती, त्यामुळे ओळखी वाढत होत्या. तसेच जेथे जागतिक जाहिरातदारांची परिषद होती. त्यामध्ये शंकरभाऊ सामील झाले. निरनिराळ्या राष्ट्रांत द्वेष व बेबनाव वाढण्यास वृत्तपत्रे कारणीभूत असतात. त्यांच्या निषेधाच्या ठरावावर शंकरभाऊंनी
प्रभावी भाषण केले. त्यांना ब्रिटिश पार्लमेंटकडून जेवणाचे बोलावणे आले. भोजनानंतर तीन वक्त्यांची भाषणासाठी निवड झाली, त्यात शंकरभाऊंचे नाव आले. त्यावेळी ते म्हणाले, ''जाहिरात देणे म्हणजे चांगल्या गुणांचे वर्णन करणे. तिचा उपयोग फक्त व्यापाराची वाढ करणे एवढाच नाही. मित्राला मदत करायची तर आपण त्याचो तारीफ करतो. त्याला उत्तेजन मिळून तो सद्गुण वाढवीत जातो.जसे व्यक्‍तीला तसेच समाजाला व देशालासुद्धा आवश्यक आहे. याच्या उलट माझ्याच देशाबद्दल जगात वाईट जाहिरात होते असे मला दिलगिरीने सांगावेसे वाटते, म्हणून आपण सर्व जमलेली मित्रमंडळी इतरांची अप्रतिष्ठा होईल अशा कंड्या पिकविण्याची काम करायचे नाही असा निर्धार करू या. याच्यामुळे देशांत शांती व स्वास्थ वाढून जगाचे कल्याण होईल.'' असे म्हणून त्यांनी आपले भाषण संपविले.

शंकरभाऊंचा अभ्यासक्रम पूर्ण होऊन डिप्लोमा तर मिळालाच; पण इंग्लंडमधील सेल्स मॅनेजर्स असोसिएशनचे सभासदत्व शंकरभाऊंना विधिपूर्वक देऊन प्रि. अँटवूड यांनी त्यांचा गौरव केला. यानंतर इंग्लंड व जर्मनीची धावती सफर करून त्यांनी इटलीतील चित्रकलेच्या प्रदर्शनाला गाठले. मगच ते हिंदुस्थानला जाणाऱ्या बोटीत चढले. मुंबईस काही मंडळी बंदरावर आली होती. पुढे सकाळच्या गाडीने ते ५ मे १९२५ ला किर्लोस्करवाडीस दाखल झाले. त्यांच्यासाठी एक-दोन मजली नवे घर बांधले होते.

ऑफिसात गेल्यावर स्वत:च्या कामाचा विचार पुढे आला. त्यामध्ये साताऱ्याच्या कोर्टात 'किर्लोस्कर ब्रदर्स विरुद्ध कूपर कारखाना' असा एक महत्त्वाचा खटला चालू आहे हे शंकरभाऊंना समजले. किर्लोस्कर कारखान्यासाठी सुमारे ४५ हजार रुपये किंमतीचे लोखंड मुंबईहून मागवले होते, ते वाटेतच पाडळीच्या स्टेशनवर कूपरनी उतरवून घेतले होते. ते त्यांनी वापरूनही टाकले होते. किर्लोस्कर कारखान्याच्या संचालकांपैकी श्री. गुजर वकीलच असल्याने कारखान्याच्या बाजूचा ११९ साक्षीदारांचा कडेकोट पुरावा होता, पण साक्षीची लांबड टाळून शंकरभाऊंनी न्यायाधिशांना योग्य मुद्दे दाखवून धनजीशा कृपर यांचेकडून आपल्या कारखान्याची नुकसान भरपाई मिळवलो.

म्हणून कारखान्याच्या व्यवस्थापनेत नव्या कल्पना आणून सुधारणा करणे आवश्यक होते. एव्हाना कारखान्याचे बाल्य संपले होते. पूर्णपणे एकतंत्री कारभार, निर्भेळ मालकशाही, मालकांनी सांगितले की सर्वसाधारण ऐकायचे अशीच कामगारांची निमूटपणे पद्धत होती. हे मालक त्यांच्या कामगारांची परोपरीने काळजी घेत म्हणून त्यांच्या मुलाप्रमाणेच कामगार लक्ष्मणरावांना पप्पा व राधाबाईना मम्मा म्हणत, ते योग्यच होते. पण आता कामगारांची संख्या सात - आठशेवर गेली होती. साऱ्या कामाची पद्धतशीर खातेवाटणी करून खातेप्रमुखाचे अधिकार, कामगारांचे वेतनमान, त्यांना मिळणाऱ्या सवलती यांचे काही नियम होणे आवश्यक होते. शंकरभाऊंनी त्यासाठी काही तक्ते तयार करून काकांच्या पुढे ठेवले. तर ते म्हणाले, 'तुझा विचार चुकीचा नाही; पण आपले कामगार धाक असला तरच कामाकडे लक्ष देतील. लाड कराल तर कारखाना चालणार नाही. आपली चाललेली व्यवस्था उत्तम आहे. त्यात बदल नको.''

किर्लोस्कर व कृपर कारखान्यांचा सर्वांत जास्त खपणारा माल म्हणजे नांगर. नांगराच्या विक्रीवर कारखान्याची सारी मदार असे. दोन्ही कारखान्यांचा माल तंतोतंत सारखा. किर्लोस्कर कारखान्यातील माणसे नेऊन तोच माल तयार करून कूपरसाहेबांनी किर्लोस्करांबरोबर स्पर्धा सुरू केली ही गोष्ट काकांना झोंबली होती. म्हणून त्यांनी किर्लोस्कर नांगराच्या किंमती उतरवून कूपर कारखान्याला शह दिला. यावर कुपरही जिद्दीला पेटले. त्यांनी किर्लोस्कर कारखान्यापेक्षा किंमती कमी केल्या. ही चढाओढ थांबली नाही, तर दोन्ही कारखाने डबघाईला येणार असे दुश्चिन्ह दिसू लागले. लंडनमध्ये शंकरभाऊंनी एकाच प्रकारचा माल करणारे अनेक कारखाने असले, तरी व्यवसायबंधू या नात्याने ते एकमेकांशी सहकार्याने वागतात हे पाहिले होतेच. प्रत्यक्ष कूपर स्वतः किर्लोस्करवाडीस आले. दोघांनी तयार केलेल्या मालाच्या रास्त किंमती, कमिशनचे दर ठरवून एकाच भावाने आपला माल विकावा हे कूपर व काका दोघांनाही मान्य झाले. जाताना कृपर थांबून म्हणाले, ''लक्ष्मणराव तुम्ही शंकरसारखी माणसं सांभाळली आहेत हा तुमवा खरोखर फार मोठा गुण आहे. त्यांची नीट काळजी घ्या.'' शंकरभाऊंची पहिली सूचना विचार फेटाळली गेली तरी त्यांच्या दुसऱ्या कल्पनेला काकांनी विरोध केला नाही. नंतर सिंहावलोकन केल्यावर असे दिसले कौ, एकाच नव्हे तर दोन्हीही कारखान्याचे त्या कल्पनेने हित साधले.

Hits: 271
X

Right Click

No right click