किर्लोस्कर खबर - ४

Parent Category: मराठी पुस्तके Category: शंकरराव किर्लोस्कर - पुस्तक

१९२४ च्या काळातील मराठी वाचकांच्या जगाची थोडी कल्पना आली तरच या विधानाचे महत्त्व कळण्याजोगे आहे. वतनदारी शेतीच्या सरंजामी संस्कृतीमध्ये पिढ्यान्पिढ्या वाढलेल्या समाजामध्ये वतनदारीचे उत्पन्न अपुरे पडत हळुहळू संपुष्टात येऊ लागले होते. '*धरचे खाऊन सुखी'' ही कल्पना फोल ठरलो होती. इंग्रजांनी आणलेल्या शिक्षणाचा परिचय नुकताच कोठे झाला होता. तोही शहरातल्या चाकरमाने होऊ पाहणाऱ्या थोड्यांना. इतरांच्या मनावर दैववादाची सुस्ती पसरलेली होती.

ब्राह्मणांत पुरुषही जेमतेस सात बुके झालेले. ख्रियांना शिकविण्याची सुधारकांनी थोडी सुरुवात केली तेवढीच. पुराण-कोर्तत हीच लोकशिक्षण व रंजनाची साधने होती. नियती, दैववाद, अंधश्रद्धा, चमत्कार याच कल्पनांचा प्रभाव जनमानसावर पडत असे. त्यामधून अल्पसंतुष्टतेचे मिळणारे विचार कोंडी करणारे, कालबाह्य वाटत होते. प्रत्येकाने स्वत:ची प्रगती स्वत: प्रयत्न करून केली पाहिजे, हे दरमहा सतत विविधप्रकारे सांगणाऱ्या किर्लोस्कर खबरने' 'ठोठावा म्हणजे उघडेल' अशी प्रयत्नवादाची नबी वाट दाखविण्याचे जे काम घालविले होते त्यामुळे धीर येऊन ही लोकप्रियता मासिकाला मिळाली हे नि:संशय!

हा काळ गुरुवर्य अण्णासाहेब कर्वे यांच्या अनाथमहिलाश्रमाच्या विकासाचा होता. गरजू विधवा, मुली यांच्या शिक्षणाची संस्थेत सोय करण्यासाठी महिला कार्यकर्त्या प्रयत्न करीत होत्या. गावोगाव जाऊन, संस्थेची माहिती समाजास सांगून या कार्यकर्त्या निधी जमवित होत्या. त्यानंतर काही दिवसांनो कर्वे यांच्या संस्थेला मिळणारी बरीच मोठी देणगी देणगीदाराने काही गैरसमजुतीने थांबविली. त्यामुळे संस्था अडचणीत आली होती. त्यासाठी अण्णासाहेब कर्वे ब बाया किर्लोस्करवाडीस आले. ती हकीगत ऐकल्यावर किर्लोस्करवाडीमधून नागरिकांनी काही मदत जमवलीच; पण त्याबरोबरच अण्णासाहेब कर्वे यांची समाजसेवा किती अमोलिक आहे व त्यांच्याव!र ओढवलेला प्रसंग किती बिकट आहे याची किर्लोस्कर खबरने वाचकांना कल्पना दिली. त्याबरोबरच या अवघड प्रसंगी संस्थेला शक्‍य ते सहाय्य करण्याची एका खास सचित्र लेखाद्वारे वाचकांना विनंती केली. अंक प्रसिद्ध होताच चेक व मनीऑर्डर यांच्या रुपाने मासिकाकडे देणग्यांची एकच गर्दी उडाली. त्यांची पोच मासिकात दिली जाई व या रकमा हिंगण्याला संस्थेकडे पाठविल्या जात.

किर्लोस्कर ब्रदर्स ही कंपनी लिमिटेड झाल्यावर तिच्या डायरेक्टर बोर्डामध्ये ओऔधधचे राजेसाहेब, कोल्हापूरचे भास्करराव जाधव, साताऱ्याचे रावबहाद्दर काळे व वडिलधारे कुटुंबीय असे नियोजित झाले. त्यांनी मॅनेजिंग एजन्सीमधील तरुण मंडळोपैकी माधवराव व शंतनुराव किर्लोस्कर यांना इंजिनियरिंगच्या शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवावे आणि शंभोराव जांभेकर आणि विष्णुपंत किर्लोस्कर यांना जर्मनीमध्ये पाठवावे असे ठरविले.

Hits: 250
X

Right Click

No right click