१२. भाऊरावांच्या कर्तृत्वाचा सन्मान - ६

Parent Category: मराठी पुस्तके Category: कर्मवीर भाऊराव पाटील

१२. भाऊरावांच्या कर्तृत्वाचा सन्मान - ६
१५) आधुनिक महाराष्ट्राच्या शंभर निर्मात्यांमध्ये (प्रा. गं. बा. सरदार आदींनी संपादिलेल्या महाराष्ट्र जीवन, भाग २, पृ. ५६७) भाऊरावांचा समावेश करण्यात आला आहे. परंतु सामाजिक सुधारक म्हणून जेव्हा भाऊरावांचा विचार केला जातो, तेव्हा असे दिसते की महात्मा फुल्यांच्यानंतर विसाव्या शतकाच्या पहिल्या साठ वर्षात छत्रपती शाहू महाराज सोडले तर महाराष्ट्रातील सामाजिक व शैक्षणिक कार्य करणार्‍या समाजसेवकांमध्ये भाऊराव पाटील यांचे स्थान अत्त्युच्च होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व अतिशय गतिमान होते. शिक्षण व सामाजिक क्षेत्रास त्यांनी दिलेले नेतृत्व अतुलनीय असेच होते.
जवळ जवळ ४४ वर्षे ते महाराष्ट्रीय जनतेचे हृदयसम्राट होते. अनेक वेळा त्यांची कुचेष्टा करण्यास आलेले महाभाग त्यांच्या कार्यापुढे विनम्र होऊन, हात जोडून त्यांची स्तुती करू लागत. असा होता त्यांच्या कार्याचा महिमा. त्यांच्या अव्यभिचारी ध्येयनिष्ठेचा व अतुलनीय त्यागाचा हा परिणाम होता. त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वापुढे इतर सामाजिक सुधारक खुजे वाटतात. सुरवातीस अव्यवहार्य दिसणार्‍या त्यांच्या कल्पना व विचार आकारास येताच मोठे अर्थशास्त्रज्ञ व शिक्षणतज्ञ अचंबा व्यक्‍त करून आपल्या जिव्हेवर नियंत्रण ठेवीत. भाऊराव सत्य-अहिंसेचे पुजारी असले तरी अन्याय दिसताच
नाठाळांचे माथी तुकोबारायाप्रमाणे काठी उगारण्यास ते मागेपुढे पाहत नसत. त्यांच्या हातातील काठी जणू त्याचे प्रतीक होते.

१६) पिळवणूकरहित एकसंध, एकात्म अशा भारतीय समाजनिर्मितीचे भाऊरावांचे ध्येय असल्याने त्यासाठी ते विविधांगाने झटत राहिले. ग्रामोद्वार व शिक्षण ही त्या ध्येयसिद्धीची आयुधे होती. या आयुधांच्या द्वारे लढत असताना त्यांचा गौरव होण्याचे अनेक प्रसंग आले.

१७) भाऊरावांचा पहिला गौरव लक्ष्मणराव किर्लोस्करांनी आपल्या २९-१०-१९२१ च्या पत्रात भाऊरावांचा राजीनामा स्वीकारताना त्यांच्या देशभक्तिपर सेवेचा केलेला आहे. त्याच्या पुढील महिन्यात ८-१२-१९२१ रोजी नेर्ले येथे वसतिगृह सुरू करताना तत्कालीन जिल्हाधिकारी आ. एन. एल. माॉयसी यांनी भाऊरावांचा 'सत्यशोधक मिशनरी' म्हणून सत्कार केला आहे. भाऊरावांनी शैक्षणिक कार्यास व ग्रामोद्वार चळवळीस वाहून घेतल्यावर सातारचे जिल्हाधिकारी हमीद ए. अली सन १९३५ ते 9९३८ च्या अहवालास प्रस्तावना लिहिताना भाऊराव, त्यांची रयत शिक्षण संस्था व छ. शाहू बोर्डिंग हाऊसबद्दल म्हणतात,

("It is one of India's most splendid activities. The great banyan tree under which Chhatrapati Shahu Boarding House has its life, is indeed an appropriate symbol of the work done by Mr. Bhaurao Patil and his Colleagues, and who can see that banyan tree and see Bhaurao without feeling that they are not alike but identical, the same burly flowing fgure, the same indomitable will to spread for giving more and ever more a truly religious shade to all corners !")

(या प्रस्तावनेनंतरच रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह वटवृक्ष झाले.) त्यानंतर श्री. हमीद अलीनी म्हटठे, “Here one sees the foundation being laid of the education that India wants. The success of Bhaurao's Work is a magnificient justification of his un-conquerable faith and sacrifices and gives confidence in the fineness of humanity." ( पू. इ-५ )

Hits: 399
X

Right Click

No right click