५. संस्थानी पोलिसांच्या विळख्यात - ४

Parent Category: मराठी पुस्तके Category: कर्मवीर भाऊराव पाटील

५. संस्थानी पोलिसांच्या विळख्यात - ४

८) भाऊरावांना अटक केल्यानंतर मातोश्री गंगाबाई कोल्हापुरात भाड्याचे घर घेऊन राहिल्या. त्यांनी कोल्हापूरच्या पोलीसप्रमुखास भेटून
भाऊरावास सोडण्यास विनविले. फर्नांडिस म्हणाला, “बाई, ही सारी तुमच्या माणसांचीच करणी आहे. महाराजांचा त्यात काही संबंध नाही.”
तेव्हा गंगाबाईंनी शाहू महाराजांना सोनतळी कॅम्पच्या वाटेवर आडवे जाऊन भाऊरावास सोडण्याची विनंती केली, “महाराज, मी तुमची धर्माची बहीण आहे.” म्हटल्यावर महाराजांनी मातोश्री गंगाबाईच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवला; व श्री. घाटगे नावाच्या वकिलामार्फत अर्ज
करावयास सांगितले. दरम्यान. महाराजांनी आपल्या कोठीवाल्यास गंगाबाईंना लागेल तो कोरडा शिधा द्यावयास सांगितळे. इकडे सातार्‍यात
भाऊरावांचे वडील पायगौंडा पाटलांनी सातारचे वकील डोसाभाईमार्फत सातारच्या कलेक्टरना अर्ज करून ब्रिटिश सरकारच्या सेवेत असलेल्या
नागरिकाच्या मुलास कोल्हापूरचे पोलीस त्रास देत असल्याने कोल्हापूरच्या पोलिटिकल एजंटना कळवून त्यांची सुटका करण्याविषयी लिहिले. शेवटी
२५ जानेवारी १९१५ च्या सुमारास भाऊरावांची कोल्हापूरच्या तुरुंगातून सुटका झाली.

९) भाऊरावांना सोडण्यापूर्वी श्री. निटवे आदींनी सौ. गंगाबाईंना गाठून भाऊरावास पोलीस सांगतात तसा जबाब देण्यास मन वळविण्यास
सांगितले. त्या धीट आणि धाडसी मातेने या नतदृष्टांना पुढीलप्रमाणे उत्तर दिले व त्यांचे तोंड व कारवाया बंद केल्या. त्या म्हणाल्या, “माझा भाऊ
आपल्या गुरुविरुद्ध खोटी साक्ष देणार नाही. तुम्ही मला कितीही प्रलोभने दाखविली तरी मी त्यास बळी पडणार नाही. खोटे बोलण्यापेक्षा माझा मुलगा मेला तरी मी दु:ख मानणार नाही. मला तीनच मुलगे होते असे यापुढे मानीन. निघा इथून.” अशा या धीट व धाडसी मातेच्या मुलाकडून विष्यात अलौकिक काम होणार होते, म्हणून ते या कोल्हापुरी अजगरी विळख्यातून सहीसलामत वाचले.'

१०) भाऊरावांना कोल्हापुरातीळ तुरुंगातून घरी नेण्यासाठी सकाळी १० च्या सुमारास त्यांचे आईवडील जेलवर गेले. जेलमधून बाहेर पडताना भाऊरावास पुन्हा अटक होण्याची शक्‍यता पायगोंडा पाटलांना कोणीतरी दिली होती. पोलिसांनी भाऊराव बाहेर पडताच प्रथम त्याने कोल्हापूर पोलीसप्रमुखांना भेटले पाहिजे असे सांगितले. पावगौंडा पाटलांनी “आम्ही तिकडेच निघालो आहोत,” असे सांगून पोलिसांना चकविले. ज्या टांग्यात ते बसठे होते त्या यंगेवाल्यास स्टेशनवर लवकर चलण्यास सांगितले. भाऊरावात स्टेशनच्या आवारात सोडून, पायगौंडा पाटील रेसिडेंटच्या बंगल्यावर जाऊन पोलीस पुन्हा भाऊरावास पकडण्याच्या तयारीत असल्याचे निवेदन दिले. भाऊरादं दुसर्‍या दिवशीच्या पहाटेस स्टेशनवरील कोल्हापूर पोलिसांचा डोळा चुकवून रेल्वेरूळाच्या बाजूने काही अंतर पळत जाऊन शेतामधून चालत, लपत छपत ता. २६-१-१९१५ रोजी दुधगावला येऊन पोहोचले. तेथे काही दिवस श्री. कुदळ्यांच्याकडे थांबले. या जीवघेण्या अटकेच्या काळात श्री. भाऊदादा कुदळे भाऊरावांचे १०-६-१९०४ चे पत्र घेऊन सातारचे _ कलेक्टर, कोल्हापूरचे पोलिटिकळ एजंटना भेढून भाऊरावांना सोडविण्याची खटपट करीत होते. भाऊरावांच्या सुटकेचा आनंद त्यांच्या मातापित्याएवढाच त्यांची पत्नी सौ. लक्ष्मीबाई व भाऊरावांचा जीव वाचवणार्‍या अंबुबाई मुद्रावळेना झाला. या दोघा स्त्रियांचा कर्मवीरांच्या शैक्षणिक कार्यात अत्यंत त्यागमय असा मोलाचा वाटा आहे.

११) सुटकेनंतर काही काळ भाऊराव उद्विग्न होते. एके दिवशी त्यांची व कोल्हापुरातील विद्यार्थिदशेतील मित्र आत्मारामपंत ओगले यांची
कुंडल (आताचे किर्लोस्करवाडी) स्टेशनवर अचानकपणे गाठ पडली. श्री. ओगले व किर्लोस्कर स्वदेशीचे पुरस्कर्त होते. त्यांनी या किर्लोस्करवाडीस स्वतःचे कारखाने सुरू केले होते. भाऊरावांचे कोल्हापुरातील जीवघेणे प्रकरण ऐकून श्री. आत्मारामपंतांनी त्यांना आपल्या काच कारखान्याचे प्रमुख विक्रीप्रचारक नेमले व त्यांना मदत करण्याचे ठरविले. पुढे किर्लोस्करांनीही भाऊरावांना आपल्या कारखान्याच्या कामात विक्रीप्रचारक म्हणून नेमले.

१२) पुढे सन १९२० साली शाहू महाराजांनी हुबळीस सामाजिक परिषदेचे अध्यक्ष असताना तेथेच २७ जुठेस पत्र लिहून श्री. लट्ठ्यांची
डांबर प्रकरणाबद्दल क्षमा मागितली आहे. (और. लठ्ठयांचे मद्दाण्णाकृत चरित्र (१९७९) प. ६२ सोबत झेरॉक्स पत्र) या शिवाय ता. १६-१२-१९१८
रोजी श्री. लठठेंची श्री. निटव्यांनी माफो मागितली होती. (लठ्ठे चरित्र, पू. ६४)

 

Hits: 300
X

Right Click

No right click