५. संस्थानी पोलिसांच्या विळख्यात - ३

Parent Category: मराठी पुस्तके Category: कर्मवीर भाऊराव पाटील

५. संस्थानी पोलिसांच्या विळख्यात - ३

६) मे १९१४ मध्ये कोल्हापूर दरबारने डांबर फासणाऱर्‍्यास पकडून देणाऱ्यास रु. ५०००।- चे इनाम जाहीर केले होते. मुंबई सरकारचा
सत्यशोधकावर संशय असल्याने कोल्हापुरातील भास्करराव जाधव, म. ग. ' डोंगरे व लठ्ठे आदींनी सत्यशोधक समाजाशी संबंध तोडल्याचे जाहीर केले.

परंतु मुंबई शासनाचा संशय लठ्ठयांवर असल्याचे जाहीर झाल्याने जून महिन्यात त्यांचेवर पकड वॉरंट जाहीर केले. सदर बाब लठ्ठयांचे स्नेही रा. ब.
दिवाण सबनीस यांना कळल्याने त्यांनी श्री. लठ्ठयांना तात्काळ निरोप पाठविला व कोल्हापूर सोडण्यास सांगून कटाची कल्पना दिली. सदर बाब
ब्रिटिशांचे कोल्हापुरातील प्रतिनिधीचे कानावर घालणे श्री. लठ्ठ्यांना उचित वाटले. श्री. लठ्ठयांनी घरी जाऊन टेबलाच्या खणातील डांबराचा डबा,
त्याची पावती व कोणत्या पुतळ्यास डांबर कसे फासावयाचे याची योजना असलेले कागद घेतले व रेसिडेंटच्या बंगल्यावर जाऊन हे साहित्य त्यांचे
ताब्यात दिळे व कटाचा इतिहास सांगितला. रेसिडेंटला त्याची खात्री झाल्याने त्यांनीही तात्काळ कोल्हापूर सोडण्यास श्री. लठ्ट्यांना सांगितले.
त्याच रात्री श्री. लठ्ठे मालगाडीने ड्रायव्हरच्या कृपेने सांगलीस आले.

कोल्हापूरचे पोलीस सांगलीतही त्याचे मागावर होते. श्री. बळवंतराव धावत्यांच्या सावधगिरीमुळे श्री. लठ्ठे मिरज स्टेशनवर आले. रेल्वे हद्द
ब्रिटिशांची असल्याने कोल्हापूरचे पोलीस त्यांना पकडू शकले नाहीत. ते बेळगावास गेले. तेथे त्यांच्यावरील खटला चालला. त्यात लठ्ठे निर्दोष ठरले.
७) इकडे कोल्हापुरात भाऊरावांनी यमयातनातून सुटका होण्यासाठी कावळा नाक्‍याजवळीस विहिरीत, बहिर्दिशेस जाण्याचे निमित्त कसून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. विहीर गाळाने भरलेली असल्याने ते वाचले. शिपायांनी त्यांना बाहेर काढून दवाखान्यात नेले.

रात्रीच्या वेळी भाऊरावांनी आत्महत्येचा दुसरा प्रयत्न केला. दवाखान्याच्या खिडकीची काच फोडून त्याचे लहान तुकडे खाऊन त्यावर कंदिलातील
रकेल पिऊन टाकले. त्यातूनही भाऊराव वाचले. शौचावाटे हे तुकडे निघून गेळे. भाऊरावांकडून पाहिजे ते जबाब मिळत नसल्याने, कंटाळून
कोल्हापूरच्या पोलिसांनी दुसरा कट रचला. सातारला भाऊराव ज्या अंबुबाई मुद्रावळ्यांच्या घरात राहात होते तेथे डांबर प्रकरणाचे काही बनावट कागद टाकून ते भाऊरावांचे आहेत हे कोर्टापुढे आणण्यासाठी अंबूबाईंना लाच देण्याचा प्रयत्न केला. पण एकनिष्ठ अंबूबाईने भाऊरावांवरील प्रेमाने या कटात सामील होण्याचे साफ नाकारले. एवढेच नव्हे तर त्यांनी सातारच्या देशमुख फौजदारांना सांगून कोल्हापूर पोलीस त्यांना ञास देत असल्याचे सांगून त्यांच्यावरच डाव उलटविला. श्री. देशमुखांनी कोल्हापूरच्या पोलिसांना ब्रिटिश नागरिक असलेल्या अंबुबाई मुद्रावळ्यांना त्रास
दिल्याच्या सबबीवर अटक करण्याची धमकी देताच, ते हात हालवीत कोल्हापुरास परतले.

त्यांनी सदरची बाब मुंबई प्रांताच्या पोलिसाकडे सोपविली. श्री. रा. ह. पागे नावाच्या ब्रिटिश हद्दीतील सी. आय. डी. पोलीस अधिकार्‍याकडे भाऊरावाविरुद्ध साक्ष मिळविण्याचे काम सोपविण्यात आले. पागेनी सातारच्या गणपत मांग या खबर्‍यास भाऊरावाविरुद्ध साक्ष देण्यासाठी कोल्हापुरास आणले. कोर्टात भाऊरावास पहाताच गणपत मांग उत्तरला, "कोण! भाऊ पाटील मास्तर! नाहीबा ! असल्या देवमाणसांविरुद्ध मी साक्ष देणार नाही.” गणपत मांगाच्या पोरास भाऊरावांनी मांगवाड्यात जाऊन शिकविलेले होते. उलट त्याने भाऊरावांचे पाय धरले. कोर्टात हे दृश्य अनोखे होते. श्री. पाग्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. शेवटी भाऊरावाविरुद्ध डांबर फासण्याचे कटात काहीच हाती लागत नाही असे दिसल्यावर त्यांच्यावर चोरीचा व आत्महत्येचे आरोप ठेवण्यात आले. चौकशीच्या काळात त्यांना तुरुंगात ठेवण्यात आले होते. कोर्टात पहिला आरोप सिद्ध होऊ शकला नाही. त्यांना दुसर्‍या आत्महत्येच्या आरोपाखाली शिक्षा झाली.

Hits: 307
X

Right Click

No right click