५. संस्थानी पोलिसांच्या विळख्यात - २

Parent Category: मराठी पुस्तके Category: कर्मवीर भाऊराव पाटील

५. संस्थानी पोलिसांच्या विळख्यात - २

४) दुपारचे जेवण झाल्यावर भाऊरावांना ही योजना सांगितली व कल्लाप्पा निटवे म्हणाले, “भाऊ, श्री. लठ्ठयांनी तुला वसतिगृहातून हाकलून लावले व तुझ्या आयुष्याचे नुकसान केले. आता त्यांच्यावर सूड उगविण्याची चांगली संधी आहे. विचार कर व उद्या साक्षीस तयार राहा.” भाऊरावांनी निटव्यांचा कावा ओळखला. विचार करण्यास अवकाश दिल्याने भाऊरावांनी बाहेरून जाऊन येण्याच्या बहाण्याने प्रेसबाहेर येऊन और. भाऊ दादा कुदळे यांना शिसपेन्सिलीने पत्र लिहून श्री. अण्णासाहेबांचे जीवितास धोका असल्याचे कळविले व श्री. लठ्ठयांना सावध करण्यास कळविले. जिनेंद्र प्रेसवर परत आल्यावर पुन्हा तोच विषय भाऊरावासमोर निटव्यांनी काढला. रात्री प्रेसच्या माडीवर झोपण्यापूर्वी या साक्षीसाठी महाराज भाऊरावास इनाम देतील, रोख रक्‍कम देतील, असे प्रलोभन निटव्यांनी दाखविले. दिवसभर शांत असलेला ज्वालामुखी रात्री भडकला. भाऊराव निटव्यांना म्हणाले, “अण्णा, श्री. लठ्ठयांनी शिस्तीसाठी मला वसतिगृहातून बाहेर घालविले. तुम्ही तर खोटी साक्ष द्यावयास लावून मला जीवनातून उठविण्याचा प्रयत्न करीत आहात. मला तुमचा कावा कळला. माझा प्राण गेला तरी मी माझ्या गुरुविरुद्ध, आ. लठ्ठयाविरुद्ध साक्ष देणार नाही.”

५) आओ. निटवेशास्त्री क्षणभर स्तब्ध राहिले. भाऊरावास झोपावयास सांगून खाली प्रेसमध्ये गेळे. एव्हाना रात्रीचा बराच उशीर झालेला होता. भाऊराव अद्याप झोपण्याऐवजी विचार करीत आडवे झाले होते, तोच “आग ! आग !” म्हणून निटव्यांनी काही रद्दी जाळली व ते माडीवर आले व म्हणाले, “कायरे भाऊ, तुझी येथवर मजल जाईल असे. मला वाटत नव्हते. माझ्या प्रेसला आग लावतोस काय? आणि माझ्या कोटातले हजार रुपये सुद्धा हडप केलेस? मी पोलिसांना खबर दिली आहे. ते आता येतील व तुला अटक करून नेतील. बर्‍या बोलाने मी सांगितठे तशी साक्ष दिलीस तर तुझी सुटका होईल.”

भाऊरावांनी पुढे होणाऱ्या परिणामाची तमा न बाळगता सांगितले, “अण्णा, तुमच्या धमकावणीने मी गुरुद्रोह करणार नाही हे पक्के लक्षात
ठेवा ! ” भाऊराव प्रेसमध्ये जवळजवळ कैद होते. दुसर्‍या दिवशी सकाळी कोल्हापूर पोलीसप्रमुख फनांडिस आपल्या यमदूतासह हजर होऊन
भाऊरावास कावळ्याचे नाक्यावरील आपल्या कार्यालयात घेऊन गेले. भाऊरावाकडून कबुलीजबाब मिळविण्यासाठी त्यांचे अनन्वित हाल केले. हरभऱ्यावर लाटले, लोंबकळत ठेवून कातडी जाड हंटरने पाठ फोडली. या दोन उदाहरणांवरून काय त्रास दिला असेल याची वाचकांनीच कल्पना करावी.

Hits: 277
X

Right Click

No right click