शेंगदाण्याच्या वड्या

Parent Category: मराठी संस्कृती Category: खाद्यपदार्थ Written by सौ. शुभांगी रानडे
साहित्य :-
भाजून अर्धवट कुटलेले शेंगाचे दाणे दोन वाट्या, चिक्कीचा गूळ एक वाटी, दोन चमचे तूप.

कृती :

चिक्कीचा गूळ घेऊन त्याचा पाक तयार करत ठेवावा. चिक्कीचा गूळ नसल्यास साधा गूळ घेऊन खलबत्त्यात कुटून कुटून चिकट करून घ्यावा व मग त्याचा पाक करावा. चिक्कीचा गूळ अगर साधा गूळ यांचा पाक करताना पाणी घालू नये. पाक होत आला की त्यात तूप घालावे. त्या पाकाचा थेंब पाण्यात घालून बघावा. कडक गोळी झाली की पाक झाला असे समजावे. नंतर त्या पाकात दाण्याचे अर्धवट कुटलेले कूट घालावे व चांगले हलवून पोळपाटावर घालून लाटावे व गरम असतानाच वड्या पाडाव्यात.

Hits: 557
X

Right Click

No right click