भल्या पहाटे

Parent Category: मराठी पुस्तके Category: काव्यदीप पुस्तक - ८.निसर्ग


भल्या पहाटे अंधारी
सूर्यदेवाच्या मंदिरी
शालू नेसून अंजिरी
उषा येई ---- १

भल्या पहाटे पहाटे
सूर्यदेवा पाहू वाटे
कोंबड्याच्या मुखावाटे
संतवाणी ---- २

भल्या पहाटे सकाळी
सूर्यदेवाच्या राऊळी
पक्षी गाताती भूपाळी
आनंदाने ---- ३

भल्या पहाटेच्या क्षणी
सूर्यदेवाच्या चरणी
वृक्षवेली आनंदोनी
लवताती ---- ४

भल्या पहाटे उठोनि
सूर्यदेवाला नमुनि
सर्वांसाठी चहापाणी
माय करी ---- ५

Hits: 468
X

Right Click

No right click