पुसू नको

Parent Category: मराठी पुस्तके Category: काव्यदीप पुस्तक - ६.काव्य

पुसू नको गं सखे मला तू कविता स्फुरते कशी ?
ठाऊक नाही मला परी जणू रंभा की उर्वशी
नाचत मुरडत अलगद येती स्वर्गलोकीच्या प-या
कुंद अबोली जाईजुईच्या कळया जणू साजिर्यार ----१

पुसू नको गं सखे मला तू कविता की ही फुले ?
ठाऊक नाही मला परी जणू झोपाळा हा झुले
पहाटसमयी पारिजात हा मंदमंदसा डुले
गोजिरवाण्या गोविंदाची दुडदुडती पाऊले ---- २

पुसू नको गं सखे मला तू कविता की आरती ?
ठाऊक नाही मला परी जणू समईच्या ह्या ज्योती
वेणू घरी हा सखे श्रीहरी नाजुकसाजुक ओठांवरती
बासरीतुनी घननीळाच्या सूर जणू उमलती ---- ३

Hits: 430
X

Right Click

No right click