आस

Parent Category: मराठी पुस्तके Category: काव्यदीप पुस्तक - ४.भक्ती

देवा तुझा ध्यास, लागलीसे खास
लागे मज आस, दर्शनाची //१//

देवा तुझ्या पायी , ठेविते मी डोई
आहे तुझ्या ठायी,भक्ती माझी //२//

देवा तुझा छंद , हाच माझा बंध
वाया हा सत्संग, जावो नये //३//

देवा तुझ्या नामी , लागे मज प्रीती
ठेवी माये माथी , कृपादृष्टी //४//

देवा तुझ्या दारी, कोणी ना भिकारी
प्रेमे जेऊ घाली, निजकरे //५//

Hits: 395
X

Right Click

No right click