मार्जरान्योक्ति

Parent Category: मराठी पुस्तके Category: सांगावा कवितासंग्रह

चोरूनी दुग्धा चाखणाऱ्या
मार्जारा, तू भुलू नको
आयुष्याच्या अंती सुध्दा
अवैधमार्गाधरू नको... १

दुग्धावरल्या दाट सायीच्या
मोहामधि तू पडू नको
जिभल्या चाटित तोंडा पुसूनी
चाल वाकडी धरू नको .. . २

समाधानी तू ऐस जगामधि
विवेकबुद्धि सोडू नको
देव पाहतो वरूनी वेड्या
ढोंगीपणाचा आव नको .. . ३

चोरी करता मार्जाराते
वाटे कुणी ना त्या पाही
आपण डोळे मिटले तरीही
दिसते सकलही सकलाही . . .४

Hits: 229
X

Right Click

No right click