आरसा

Parent Category: मराठी पुस्तके Category: सांगावा कवितासंग्रह

आरसा जणू मानवाचा चेहरा मज भासे
मनातल्या त्या भावभावना सकला दावितसे
तो सकला दावितसे ऽऽऽ... ।।ध्रु.।।

आंनदचि तो होता त्याच्या वदनी विलसतसे
मुक्तपणाने आंनदाची उधळण करीतसे
आनंदाचे अमृतकण तो सकला देतसे
स्वर्गसुखाच्या लाभाने तो मोहरून येतसे
तो मोहरून येतसे ऽऽऽ...
आरसा जणू मानवाचा चेहरा मज भासे... १

दु:खाचे ते डोंगर सहजी पचवू शकतसे
संकटावरी मात करोनी मार्ग क्रमीतसे
विपत्तिच्या त्या लाटांवरती स्वार होतसे
कधीमधी परि मनिची खळबळ वदनी दिसतसे
त्याच्या वदनी दिसतसे ऽऽऽ...
आरसा जणू मानवाचा चेहरा मज भासे... २

गोष्टी घडता नावडत्या मनि राग येतसे
दुर्वासचि तो मनात त्याच्या जन्मा येतसे
संतापाने चेहरा लालीलाल होतसे
प्रतिबिंबचि जे मनातले ते वदनी अवतरसे
त्याच्या वदनी अवतरसे ऽऽऽ...
आरसा जणू मानवाचा चेहरा मजभासे .. . ३

सर्वजनांच्या कल्याणस्तव सदैव प्रयतावे
प्रसाधनापरि दोन गोड शब्द ओठी लावावे
चंदनापरि झिजवूनी देहा सूखचि उधळावे
चांदणे मग चित्तामधले वदनी उतरसे
त्याच्या वदनी उतरसे ऽऽऽ...
आरसा जणू मानवाचा चेहरा मज भासे .. . ४

Hits: 230
X

Right Click

No right click