गुणगान

Parent Category: मराठी पुस्तके Category: सय कवितासंग्रह

करी देवाजीच्या तू गुणगाना
का रे फिरसी तू मम मना
करी देवाजीच्या तू गुणगाना . . . ध्रु.

नामावरी त्या भक्ती तू धरी
कामा अपुल्या परि न विसरी
ठायी ठायी पाही श्रीहरी
भेटसि सहजचि रुक्मिणीरमणा
करी देवाजीच्या तू गुणगाना
का रे फिरसी तू मम मना
करी देवाजीच्या तू गुणगाना . . . १

गरुडासम तू घेई भरारी
साह्या तुजसी येई मुरारी
गुंतू नको तू या संसारी
भेटे तरी तो गोकुळकान्हा
करी देवाजीच्या तू गुणगाना
का रे फिरसी तू मम मना
करी देवाजीच्या तू गुणगाना . . . २

Hits: 326
X

Right Click

No right click