किर्लोस्कर खबर - २

Parent Category: मराठी पुस्तके Category: शंकरराव किर्लोस्कर - पुस्तक

यापुढील अंकातून उजव्या अंगास संपादकोय व डाव्या अंगास सुभाषिते, उदाहरणार्थ 'आळसाला आजचा दिवस दिला की उद्याचा त्याने चोरलाच म्हणून समजा!'' अशी कार्यप्रवृत्तीपर सुभाषिते आहेत. चौथ्या अंकापासून शंकरभाऊंनी 'यशस्वी धंद्याचे मार्ग. ही लेखमाला लिहिणे सुरू केले. 'इहवृत्त' सदरात कारखाना आणि वाडीमधील घटना, परिवारातील यशस्वी विद्यार्थी इ. बातमी स्वरूपाची माहिती देत. पत्रकारितेच्या सर्व अंगांना स्पर्श करणारी शंकरभाऊंची व्यापक दृष्टी सुरुवातीपासूनच नजरेस पडते. क्रिकेट असो नाहोतर नाटक असो, साऱ्या नादामागे कारखान्याच्या उत्कर्षाची, लोकप्रियतेत भर घालण्याची शंकरभाऊंची कळकळीची इच्छा होती. त्यांच्या अमर्याद भक्‍तीने आणि बाबुराव पेंटर यांच्या सहाय्याने कारखान्याची व किर्लोस्कर नांगराची एक फिल्म करून घेतली. १९१८ च्या सुमारास महाराष्ट्रात ही पहिली औद्योगिक फिल्म काही दिवस चित्रपटगृहात दाखवली जाई.

किर्लोस्कर खबर मासिकासाठी गणपतराव विजापुरे हा आदर्श जोडीदार शंकरभाऊंना मिळाला. दोघेही मुद्रणकलत नवखेच;, पण गणपतरावांची कल्पकता
व यंत्रशासत्रात जन्मापासून गती. काणतेहो काम हाती घेतले म्हणजे ते पुरे कल्याशिवाय राह्चे नाही हो त्यांची वृत्ती. हिशेबात तर त्यांचा हातखंडा. प्रत्येक काम आरशासारखे स्वच्छ असायचे. चित्रांचे ठसे करण्यासाठी प्रोसेस कॅमेरा नव्हता, पण साध्या कॅमेऱ्यात उलटी काच घालून काम चालवण्यात येऊ लागले. एक दिवस भट्टोत टाकायच्या लोखंडाच्या मोडीत काकांना एक फुटका हंडप्रेस दिसला आणि त्यांनी तो दुरुस्त करून शंकरभाऊंना दिला. तेव्हा नव्या उत्साहाने ते कामास लागले. छपाई आणि व्यवस्थापनाची सोय झाली; पण मासिकाच्या संपादनाचे काम शंकरभाऊंना एकट्याने कसे निभवायचे, म्हणून एखादा उत्साही लेखक ते शोधू लागले. त्यावेळी 'व्यायाम' मासिकांतील ना. ह. आपटे हे लेखक अगदी त्यांच्या थेट विचारांत बसणारे वाटले. म्हणून त्यांना पत्र टाकल्यावर १९२१ पासून सहसंपादक म्हणून ते काम करू लागले.

१९२० सालापासून वाचकांच्या मनाची पकड घेणारे इतर विषय देखींलकिर्लोस्कर मधून येऊ लागले. त्यामध्ये साहस, एकाग्रता, सामर्थ्य, आत्मविश्वास अशा गुणांबद्दल येणारे विवेचन अतिशय प्रभावी असे, पाचव्या अंकापासून खबरला मोठ्या टाईपात छापलेले चित्रमय मुखपृष्ठ लाभले आणि उद्योग, उत्साह, आत्मोलती असा शिरोलेख पुढे प्रत्येक अंकावर येऊ लागला. जानेवारी २१ पासून ''मी यशस्वी कसा झालो?'' यासंबंधी स्वतःचे अनुभव लिहून पाठविण्यासाठी वाचकांना आवाहन करण्यात आले.

त्यामध्ये स्वत:च्या चुका समजून त्या टाळता कशा येतील याचे मार्गदर्शन व्हावे असा या उपक्रमाचा हेतू होता. परदेशात गेलेल्या मित्रांकडून शंकरभाऊंनी हेत्री फोर्ड, वेस्टिग हाऊस, कोडॅक, इस्टमन अशा खडतर परिस्थितीतून यशस्वी झालेल्या परिश्रमी आत्मविश्वास लोकांचे परिचय लिहून घेतले. 'एक होता कार्व्हर' या पुस्तकाने अलीकडे उजेडात आलेल्या कार्व्हर आणि बुकर टी वॉशिंग्टन यांचे परिचय १९२२ मध्ये खबरने वाचकांना करून दिले. डॉ. आनंदीबाई जोशी, पारिचारिका सोताबाई खोत यांचे परिचय १९२३ मध्ये लिहिले गेले.१९२० मध्ये अंकाची पाने आठऐवजी बारा करण्यात आली. वार्षिक वर्गणी मात्र एक रुपयाच राहिली. 'किर्लोस्कर खबर' हे कारखान्याच्या प्रगतीची माहिती देणारे आणि समाजातील स्वदेशी उद्योगाविषयी प्रेम व आस्था वाढविणारे पत्र तर होतेच; पण त्याशिवाय त्यातील माहिती कंटाळवाणी होऊ नये म्हणून ईतर मासिकांत जे येत नाही असे नवे काही साहित्य देण्याची धडपड असे. प्रत्येक अंकात कला व कलावंत, आद्य नाटककार अण्णासाहेब किर्लोस्कर, गायक बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर, बालगंधर्व, शिल्पकार कोल्हटकर गोरेगांवकर चित्रकार असे परिचय येत होते.

Hits: 296
X

Right Click

No right click