१. विद्यार्थिदशा आणि मनाची घडण - ४

विशाल क्षितिज गवसले

कॉलेजची चार वषें ही त्या शिक्षणाची संधी मिळालेल्या प्रत्येक तरुणाच्या जीवनात फार महत्त्वाची असतात. या कालखंडात ज्ञानाच्या क्षितिजाचे दर्शन घडविणारे प्राध्यापक मिळाले आमि भ्रंथांशी नाते जुळले तर बुद्धीला पंख जोरात फुटतात. डोळसपणे भोवतालच्या परिस्थितीचे निरीक्षण केले तर त्या काळाची आव्हाने कोणती आहेत ते समजू लागते आणि मनाला ती आव्हाने स्वीकारावी असे वाटू लागते. लहानपणी शिक्षणासाठी भ्रमंती करण्यात काही वर्षे गेल्यामुळे एस्‌. एम्‌. समकालीन विद्यार्थ्यांपेक्षा दोन तीन वर्षांनी मोठे होते आणि परिस्थितीचे जे टक्केटोणपे त्यांना लहानपणापासून मॅट्रिक होईपर्यंत सोसावे लागले त्यामुळे त्यांच्या जाणिवा प्रगल्भ झाल्या होत्या. फर्ग्युसन कॉलेजमधील ग्रंथालय उत्तम ग्रंथांनी सुसज्ज होतेच आणि तेथील 'ओपन शेल्फ' पद्धतीमुळे ज्ञानोत्सुक विद्यार्थ्यांना हवी -ती. पुस्तके वाचावयास सहंजपणे मिळत होती.

शिवाय बा. गो. काळे यांच्यासारखे विद्यार्थ्यांवर प्रेम करणारे, त्यांना उत्तम मार्गदर्शन' करणारे ज्ञानवंत प्राध्यापक एस्‌. एम्‌-ला अर्थशास्र शिकविण्यासाठी लाभले होते. राज्यशास्त्र या विषयाबद्दल एस्‌. एम.ला आकर्षण होते आणि 'कॉन्स्टिट्यूशन' या विषयावर निबंध लिहून त्याने पारितोषिकही मिळविले होते.

एकूणच कॉलेज जीवनात एस्‌. एम्‌.च्या बुद्धीस धार आली आणि मन अधिकाधिक ध्येय-सन्मुख होऊ लागले. शाळेमध्ये असताना वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये पुढाकार घेणारा एस्‌. एम्‌. कॉलेजमध्येही त्याच आत्मक्थ्यासाने वागत असे. एस्‌. एम्‌., गोरे, खाडिलकर, शिखरे, तारकुंडे आदी मित्रांचे एक सप्तर्षी मंडळ होते. हे स्थापन करण्यात एस्‌. एम्‌.चाच पुढाकार होता. नवीन पुस्तक वाचले अगर नवा विचार मांडणारा लेख सात जणांपैको कोणाच्याही वाचण्यात आला की त्याने त्यावर सप्तर्षी मंडळात बोलायचे आणि नंतर त्यावर सर्वांनी चर्चा करायची, हा सप्तर्षी मंडळाचा मुख्य कार्यक्रम होता.

तत्कालीन परिस्थिती

महाराष्ट्रातील तत्कालीन सामाजिक जीवनात ब्राह्मण-ब्राह्मणेतर असा तणाव होता. ब्राह्मण वस्तीतील सार्वजनिक होद ब्राह्मणेतरांना १९२३ पर्यंत खुले नव्हते. म. फुले यांनी त्यांच्या घरातील हौद सर्व जातिधर्माच्या लोकांसाठी खुला केल्याला अनेक वर्षे लोटली होती, तरी सनातनी वृत्तीच्या पुणेकरांच्या वागण्यात बदल झालेला नव्हता. म. फुले यांचे अनुयायी केशवराव जेथे हे नगरपालिकेचे सदस्य होते. त्यांनी १९२६ साली पुण्यातील सार्वजनिक हौद सर्वांना खुले करावेत, असा ठराव मांडला. त्याला नरसिंह चिंतामण ऊर्फ तात्यासाहेब केळकरांनी विरोध केला. इतकेच काय परंतु ब्राह्मणेतर सदस्यांनी 'हे सार्वजनिक हौद दलितांना खुले होऊ नयेत म्हणून केळकरांना पाठिंबा देऊन केशवरावव जेधे त्यांचा ठराव नापास केला. महाराष्ट्रात जेव्हा ब्राह्मणेतर चळवळ होती तेव्ह्न ब्राह्मणेतर धुढारी राजकीय चळवळीपासून दूरच राहात असत. परंतु गांधीजींच्या नेतृत्वामुळे राजकीय चळवळ आणि सामाजिक सुधारणा एकत्र येण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाल्यावर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे समाजसुधारक विचारवंत नेते, स्वातंत्र्य चळवळीत भाग घेऊ लागले आणि महाराष्ट्रातील ब्राह्मणेतर समाजाने हीच भूमिका घ्याबी, अशीही शिकवण त्यांनी दिली.

केशवराव जेधे आणि दिनकरराव जवळकर या तरुण ब्राह्मणेतर नेत्यांनीही आणि पुण्याचे श्री. आ. रा. भट यांनी पुढाकार घेतला. ते दोघेही कॉन्फरन्सचे स्वातंत्रय चळवळीत सहभागी होऊन बहुजन समाजास तोच मार्ग दाखविला. कार्यवाह होते. यूथ लीगची स्थापना आणि सायमन कमिशनवर बहिष्कार त्यामुळे १९२० पर्यंत सत्यशोधक चळवळीचे जे स्वरूप होते त्यात्त बदल टाकण्याचा काँग्रेसचा निर्णय, या दोन्ही घटनांचा एस्‌. एम्‌.च्या मनावर परिणाम झाला. एस्‌. एम्‌. शाळेत असताना पुण्यामध्ये गणपती उत्सवात मेळ्यांच्यामध्ये झाला. आपणही यूथ लीगमध्ये सामील व्हावे, असे त्यांना आणि त्यांचे सहकारी जो ब्राह्मण-ब्राह्मणेतर तंणाव त्याने पाहिला होता तो १९२५ नंतर खूपच कमी झाल्याचे त्याने अनुभवले. एस्‌. एम्‌.च्या मनात आणखीही एक वैचारिक वादळ झाले. ते हिंदू-मुसलमान प्रश्‍नाबाबत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा त्याग आणि देशभक्ती यामुळे, त्यांच्या हिंदुत्ववादी विचारांचा महाराष्ट्रातील पांढरपेशा वर्गावर प्रभाव होता. लो. टिळकांच्या निधनानंतर आणि विशेषत: म. गांधींनी १९२४मध्ये असहकाराची चळवळ मागे घेतल्यानंतर केसरीचे संपादक तात्यासाहेब केळकर तसेच त्यांच्या प्रभावळीतील अण्णासाहेब भोपटकर, ज. स. करंदीकर आदींनी म. गांधींच्या विरोधी आणि हिंदुत्ववादी भूमिका घेतली. या विचारांचा एस्‌. एम्‌.च्या मनावर काहीसा प्रभाव पडत होता. १९२६ साली अब्दुल रशीद याने स्वामी श्रद्धानंदांची जी हत्या केली त्यामुळे समाजातील वातावरण मुस्लिम विरोधी बनले. |

Hits: 251
X

Right Click

No right click