१२. भाऊरावांच्या कर्तृत्वाचा सन्मान - २

Parent Category: मराठी पुस्तके Category: कर्मवीर भाऊराव पाटील

१२. भाऊरावांच्या कर्तृत्वाचा सन्मान - २
४) रयत शिक्षण संस्थेच्या वरील पहिल्या अहवालात ऑ. सेक्रेटरी अंड. बारटक्के यांनी भाऊरावांचे वर्णन केले आहे : "A man of no university qualification, but of strong common sense, of no money but good physic and sound mind; undaunted courage and untiring energy, uninturrupted perseverance and efforts, Mr. Bhaurao Patil, a giant and all round worker, a villager himself, resolved to sacrifice his life and to devote it to the uplift of his brother villagers"
अशा या ग्रामोद्वाराच्या चळवळीत त्यावेळच्या श्री. हमीद ए. अली (आय. सी. एस.) या जिल्हाधिकार्‍यांनी भाऊरावांचा फारच चाणाक्षपणे उपयोग करून घेतला. (नोव्हें. १९३३ ते ऑक्टोबर १९३६) या ग्रामोद्वाराच्या कामासाठी भाऊरावांना ते जिल्हाभर व्याख्यानासाठी नेत. हमीद ए. अली जिल्ह्याच्या ग्रामोद्वार समितीचे अध्यक्ष व भाऊराव सभासद होते.

५) सारांश, कर्ते समाजसुधारक म्हणून भाऊरावांनी कामास सुरुवात केली ती सन १९१० सालच्या दुधगावच्या विद्यार्थी आश्रमापासून. या ग्रामोद्वाराच्या चळवळीकडे वळण्यापूर्वी भाऊराव सत्यशोधक समाजिस्ट म्हणून १९११ पासून जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेरही जलशाबरोबर व्याख्यान देत हिंडत असत व ठिकठिकाणी भरणाऱ्या सत्यशोधक समाज परिषदांना कार्यकर्ता म्हणून हजर राहत. या सत्यशोधक परिषदा एका अर्थाने सामाजिक परिषदाच होत्या. त्यांचे प्रमुख कार्य शिक्षण, सामाजिक सुधारणा व पुरोहितांच्या धार्मिक वर्चस्वास विरोध असा होता. पुढे सन १९२० साली ब्राह्मणेतर पक्ष राजकारणात शिरण्यासाठी स्थापन झाल्यावर मुंबई कौन्सिलात जातवार जागा मागण्यास मराठा समाजापासून सुरवात झाली. जातवार परिषदांना ऊत आला आणि सामाजिक सुधारणा व राष्ट्रीय एकता या विचारास खो बसत चालला होता.

- महात्मा गांधींचे समाजकारण, स्वदेशीचा पुरस्कार, राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रीय शिक्षणाच्या शाळा, अस्पृश्यता निवारण यासाठी होते. तेव्हा सन १९२१ साली किर्लोस्कराकडील नोकरीचा राजीनामा देताना सत्यशोधक समाजाच्या तत्त्वांपैकी शिक्षणच प्रथम भाऊरावांनी हाती घेतले व त्यासाठी डॉ. परांजपे, श्री. रावबहादूर काळे यांच्यासारख्या प्रागतिकांची शिक्षणाच्या कामी भाऊरावांनी मदत घेतली व त्यास ग्रामोद्वार चळवळीची जोड दिली.

६) महात्मा गांधींच्या ग्रामसुधार चळवळीत खेड्यातील उद्योगधंद्यांच्या सहकारी संस्था व त्यांचेमार्फत उत्पादनाची विक्री, शेतीची आधुनिक पद्धतीने मशागत व सुधारणा, उत्तम बेण्याचा वापर यावर व त्यासाठी शिक्षणावर भर देण्यात आला होता. भाऊरावांनी किर्लेस्करांकडील नांगराचा प्रसार करताना या बाबीवरच आपल्या सत्यशोधकी व्याख्यानातून भर दिलेला असे. परंतु शिक्षणाच्या बाबतीत खेड्यांतील शिक्षकच मार्गदर्शक असल्याने भाऊरावांनी मागासवर्गीय शिक्षकांच्या संघटनांशी संबंध जोडले व सन १९२२ साली गंगापूरच्या प्राथमिक शिक्षकांच्या अधिवेशनात त्यांच्यासाठी ट्रेनिंग कॉलेज काढण्याची घोषणा केली व तत्पूर्वी सन १९१९ व १९२१ साली काले व नेर्ले येथे सर्व जाती-जमातीच्या मुलांसाठी वसतिगृहे सुरू केली. तिसरे वसतिगृह साताऱ्यात १९२४ साली सुरू केले. ही वसतिगृहेच भाऊरावांच्या समाजसुधारणाची केंद्रे होती, ती अशी :

Hits: 357
X

Right Click

No right click