९. शिक्षणातील प्रयोग - ३

Parent Category: मराठी पुस्तके Category: कर्मवीर भाऊराव पाटील

९. शिक्षणातील प्रयोग - ३

७) महाराजांना ही योजना पसंत पडली व त्यांनी या शाळेत महाराणी जमुनाबाई शिष्यवृत्तीसाठी तात्काळ रु. ४,०००/- देऊ केले. भाऊरावांनी एवढी लहान देणगी एवढ्या मोठ्या प्रयोगासाठी स्वीकारण्याची नाराजी दर्शविली. सयाजीराव महाराजांनी देणगीचा हा पहिला हप्ता आहे असे सांगून भाऊरावांचे समाधान केले. भाऊरावांनी रक्‍कम स्वीकारली. ता. ६-२-१९३९ रोजी सयाजीराव महाराज निधन पावले. त्यामुळे महाराजांचे आश्‍वासन पुरे होऊ शकले नाही. मात्र महाराजांचे स्मारक भाऊरावांनी या हायस्कूलच्या रूपाने पुरे केले. एवढेच नव्हे तर माध्यमिक शिक्षणातही स्वावलंबनाचा उक नवा पायंडा पाडला व एका अभिनव प्रयोगास सुरुवात झाली. रयत शिक्षण संस्थाप्रणीत माध्यमिक शिक्षणाची पळवळ सुरू झाली. भाऊरावांच्या ग्रामीण शैक्षणिक प्रकल्पाचा दुसरा भाग सुरू झाला.

८) जिल्हाधिकारी हमीद ए. अली यांनी संस्थेस शासनामार्फत बक्षीस देवविलेल्या 'चार भिंती? नावाच्या टेकडीच्या पायथ्याशी सयाजीराव महाराजांच्या मृत्यूनंतर बरोबर दहा महिन्यांनी या हायस्कूलच्या व ट्रेनिंग कॉलेजच्या इमारतींचा पायाभरणी समारंभ ता. २-१२-१९३९ रोजी पार पाडण्यात आला. पायाचा दगड महाराजांचे नातू व उत्तराधिकारी प्रतापसिंह महाराज यांच्या हस्ते बसविण्यात आला. या समारंभाचे पौरोहित्य कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांनी केले. व सायंकाळी गाडगे महाराजांनी कीर्तन केले. अनेक संस्थानिक, त्यांचे सरदार या समारंभास हजर होते.

९) ही माध्यमिक शाळा भाऊराव पाटील सुरू करीत असल्याचे वरील समारंभाने जाहीर झाठे असले तरी ५ जून १९४० ला जिल्ह्यातील प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना छापील पत्रकाने ७ वी पास झालेल्या हुशार मुलांना या शाळेत पाठविण्यास सुचविले होते. वार्षिक जेवणखर्च रु. ३५ व शिक्षण फी माफ असे या शाळेचे स्वरूप होते. मात्र प्रत्येक विद्यार्थ्यास दररोज २ तास शारीरिक अम करावे लागणार होते. ही शाळा कोठे भरवावयाची ? इमारतीचा प्रश्‍न तातडीचा होता. महाराष्ट्रातील आणखी एक दानशूर संस्थानिक, फलटण संस्थानचे राजे श्रीमंत मालोजीराव नाईक निंबाळकर महाराज भाऊरावांच्या मदतीस धावून आले. भाऊरावांना ते आपल्या वडीलबंधूंच्या ठिकाणी मानत होते. साखरवाडीचा फलटण साखर कारखाना निघाला. त्या कारखान्याच्या अडचणीच्या वेळी मजुरांचे प्रश्‍न सोडविण्यास भाऊरावांनी मदत केली होती. भाऊरावांनी शब्द टाकताच फलटणच्या महाराजांनी सातारा कँपमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासाच्या पिछाडीस असलेला आपला “फलटण लॉज' बंगला भाऊरावांच्या हवाली केला. शिवाय दुरुस्तीसाठी रु. ५,०००/- रोख दिले. पाचएक वर्षात हे हायस्कूल सुस्थिर झाल्यावर सदर बंगला रयत शिक्षण संस्थेस सभोवतालच्या सुमारे १० ते ११ एकर मोकळ्या जागेसह बक्षीस दिला आणि या शाळेच्या इमारत फंडासाठी रु. ५,०००।- वेगळे दिले. जाता जाता उल्लेख केला पाहिजे तो हा की, बरोबर १०० वर्षांपूर्वी मुंबईची शिक्षण संस्था (बॉम्बे एज्यु. सोसायटी) १८४० सालापर्यंत माध्यमिक शिक्षण मोफत देत होती. सन १८४१ नंतर बोर्ड ऑफ एज्युकेशनने माध्यमिक शिक्षणास फी बसविली. असा प्रसंग पुढे या संस्थेच्या इतिहासातही आला आहे.

Hits: 282
X

Right Click

No right click