८. रयत शिक्षण संस्थेची घटना व प्राथमिक कार्य - ३

Parent Category: मराठी पुस्तके Category: कर्मवीर भाऊराव पाटील

८. रयत शिक्षण संस्थेची घटना व प्राथमिक कार्य - ३

७) पहिल्या घटनेचे स्वरूप खालीलप्रमाणे होते:

सर्वसाधारण सभेत १) आजीव सभासद २) साधे सभासद ३ ) विशेष सभासद (फेलो) ४) पुरस्कर्ते (पेट्रन) ५) साहाय्यकर्ते ( बेनिगफॅक्टर्स) यांचा समावेश होता. संस्थापक सभासद पहिल्या सर्वसाधारण सभेत होते. याशिवाय १) सेनेट २) मॅनेजिंग कौन्सिल ३ ) बोर्ड ऑफ लाईफ मेंबर्स ४) ट्रस्टी ही अधिकार मंडळे होती. सिनेट सहा सभासदांचे, मॅनेजिंग कौन्सिल बारा सभासदांचे, बोर्ड ऑफ लाईफ मेंबर्स शिक्षकांचे. बोर्ड ऑफ लाईफ मेंबर्स तयार होईपर्यंत सर्व शिक्षकांचे बोर्ड ऑफ लाईफ वर्कर्स राहाणार होते. ट्रस्टी मंडळ दोन किंवा चार सभासदांचे असे.

८) संस्थेचे ध्येय व उद्दिष्टे पुढीलप्रमाणे होती.

(अ) संस्था भारताच्या, विशेषतः सातारा जिल्ह्यातील भावी तरुण पिढ्यास प्रागतिक परंतु गुणवत्ता वाढविणारे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण
देईल. त्यात भाषिक, शेतकी, शास्त्रीय, तांत्रिक, व्यापारी व औद्योगिक आणि शारीरिक शिक्षणाचा समावेश असेल.

(ब) या शिक्षणातून नि:स्वार्थापणा व अममाहात्म्य याचे आदर्श मुलांपुढे ठेवून, 'कमवा व शिका? यांस प्रोत्साहन दिले जाईल. धर्म, जात, पंथ व वर्गभेदरहित संस्था चालविली जाईल.

(क) संस्था, राजकारणविन्मुख राहील. व्यवस्थापक मंडळ, सभासद, शाळेतील किंवा शाखेतील शिक्षक व सेवक संस्थेच्या किंवा शाखांच्या आवारात कोणत्याही राजकीय चळवळी करणार नाहीत. शाळेतील किंवा शाखांतील विद्यार्थी राजकारणात सक्रिय भाग न घेता स्वत:च्या अभ्यासात प्रगती करण्याकडे आपले संपूर्ण लक्ष देतील.

९) आजीव सभासद शक्‍यतो माजी विद्याथ्यामधून विहित पदव्या धारण करीत असल्यास निवडण्यात येत, अर्थात अपवादही चांगल्या शिक्षकाच्या बाबतीत करण्यात येई. उदा. जी. टी. जोशी, एस. एस. बेडकोहाळ, एल. एम. सुभेदार, एन. एन. दोशी ही संस्थेच्या कार्याशी एकरूप झालेली शिक्षक मंडळी आजीव सभासद होती.

१०) रयत शिक्षण संस्था रजिस्टर्ड झाल्यावर भाऊरावांनी सन १९२१-२२ साली सातारा तालुक्यातील अंगापूर गावी मागासवर्गीय शिक्षकांच्या अधिवेशनात प्राथमिक शिक्षकासाठी अध्यापक विद्यालय सुरू करण्याचे जाहीर केले होते. परंतु आपल्या वसतिगृहातून हे ट्रेनिंग कॉलेज चालविणारे पदवीधर अनुयायी तयार करणे महत्त्वाचे होते. या चरित्रातून आपणास दिसून येईल को एका विशिष्ट क्रमाने स्वत:स जाणवलेला ग्रामीण शिक्षणाचा आकृतिबंध भाऊराव तयार करीत होते. आधुनिक शब्दप्रयोगात म्हणावयाचे तर भाऊरावांचा हा शैक्षणिक प्रकल्प (प्लँट) उभा करण्यास लागणारे व त्याची जबाबदारी अंगावर घेणारे शैक्षणिक तज्ज्ञ मिळविणे किंवा शिकवून तयार करणे महत्त्वाचे होते. या शैक्षणिक तज्ज्ञांद्वारे खेड्याचा नेता म्हणजे प्राथमिक शिक्षक आपल्या तत्त्वाप्रमाणे तयार करण्याची आवश्यकता होती. म्हणून संस्था रजिस्टर होताच भाऊराव ट्रेनिंग कॉलेज काढण्यास तयार झाले.

Hits: 376
X

Right Click

No right click