८. रयत शिक्षण संस्थेची घटना व प्राथमिक कार्य - २

Parent Category: मराठी पुस्तके Category: कर्मवीर भाऊराव पाटील

८. रयत शिक्षण संस्थेची घटना व प्राथमिक कार्य - २

४) ६ मे १९३५ या तारखेस सातार्‍यात धनिनीच्या बागेत रज्यारोहणाची रजत जयंती साजरी करण्याचे ठरले. तत्पूर्वी भाऊराव श्री. हमीद ए. अलींना विनोदाने म्हणाळे, “रौप्यमहोत्सव साजरा करू; पण या महोत्सवानिमित्त काही रौप्य मिळणार आहे काय?” हमीद अलींनी, “होय. रौप्य देऊ की !” म्हटले. या दिवशी सकाळी साडेसात वाजता सारे सरकारी अधिकारी व रावसाहेब, रावबहादूर आदी राजनिष्ठ लोक धनिनीच्या बागेत
हजर राहिले. बादशहा पंजम जॉर्ज यांना दीर्घायू व आरोग्य लाभण्यासाठी प्रार्थना केली. या प्रार्थनेनंतर सभा झाली आणि रयत शिक्षण संस्थेच्या
घटनेस सरकारी मान्यता मिळाल्याचे व या संस्थेमार्फत सिल्व्हर ज्युबिली ट्रेनिंग (कॉलेज) स्कूल या वर्षी सुरू करण्याचे याप्रसंगी जाहीर करण्यात
आले. एवढेच नव्हे तर रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्षपदही स्वीकारण्याचे हमीद अलींनी भाऊरावांना आश्‍वासन दिले. पण शासकीय नियमामुळे फार
दिवस या पदावरून ते राहू शकले नाहीत. परत श्री. काळेच अध्यक्ष झाले.

५) भाऊरावांना हे आश्‍वासन देण्याचे कारण सातारला जिल्हाधिकारी असलेल्या एकूण तीन वर्षांच्या मुदतीत आरी. हमीद अलींनी त्यांच्या पत्नी सौ. शरीफा अली यांच्यासह श्री छत्रपती बोडिंग हाऊसला अनेक वेळा भेटी दिल्या होत्या. एके प्रसंगी भाऊराव हजर नसताना त्यांनी वसतिगृहात भेट दिली. विद्यार्थी नेमून दिलेले काम शिस्तबद्ध पद्धतीने करीत होते. सर्वत्र त्यांना स्वच्छता व नीटनेटकेपणा आढळला. कोणी सिगारेट ओढतो का हे पाहण्यासाठी काही वयस्कर मुलाच्या बँगाही उघडून पाहिल्या. त्यांना काहीही आढळले नाही. मुलांना त्यांच्या जाती विचारताच हरिजन, ख्रिश्‍चन, मुसलमान, जैन व ब्राह्मण मुले असल्याचे त्यांना आढळून आले. भाऊरावांचे हे राष्ट्रीय व भावनिक एकात्मतेचे व समानतेचे काम पाहून त्यांना अतिशय आनंद झाला. सातारा सोडल्यानंतर दड रयत शिक्षण संस्येची घटना व प्राथमिक कार्य व निवृत्तीनंतरही त्यांनी भाऊरावांवर व रयत शिक्षण संस्थेवर लोभ ठेवला.

६) या रौप्यमहोत्सवी समारंभात जाहीर केल्याप्रमाणे ता. १६-६-१९३५ रोजी पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये कार्यकारी मंडळाची निवड झाली.

१) श्री. हमीद ए. अली - अध्यक्ष

२) रा. ब. रा. रा. काळे - उपाध्यक्ष

रा. ब. मो. बा. मुथा - उपाध्यक्ष

२) श्री. ए. पी. मोहिते - सचिव

४) रा. ब. मो. बा. मुथा - खजिनदार

५) रा.ब. रा. रा. काळे , रा. ब. मो. बा. मुथा, श्री. भाऊरावपाटील व सरदार आर. आर. पंडितराव - विश्‍वस्त

Hits: 330
X

Right Click

No right click