७. अक्रोडाची फळे - ७

Parent Category: मराठी पुस्तके Category: कर्मवीर भाऊराव पाटील

७. अक्रोडाची फळे - ७

१९) सामान्यपणे सातवी पास झालेली मुले या वसतिगृहात दाखल केली जात. यात चार प्रकारची मुळे असत. शिष्यवृत्ती मिळवणारी
मुळे आपला भोजनखर्च या शिष्यवृत्तीतून भागवीत. घरची आर्थिक परिस्थिती उत्तम असणारी मुले पूर्ण भोजनखर्च देत.

या मुलांमध्ये सुधारगृहासाठी आलेली मुळे आहेत. या मुलांपैकी माध्यमिक शाळेत जाणारी, प्राथमिक शाळेत जाणारी, ट्रेनिंग कॉलेजमध्ये जाणारी व औद्योगिक शाळेत जाणारी मुले होती.

२०) सन १९२८ साली या वसतिगृहातून फक्त २ मुले मॅट्रिक परीक्षेत बसून पास झाली. तेव्हापासून या वसतिगृहातून मॅट्रिक. पास झालेल्या मुलांची उच्च शिक्षणाची सोय पुणे, मुंबई, कोल्हापूर, सांगली, बडोदा व बेळगाव येथे परिस्थितीनुसार व सवलती मिळण्यानुसार करण्यात येत असे. सन १९३७ साली या सातारच्या वसतिगृहातून महांविद्यालयात शिकणारी सुमारे ४५ मुले होती. त्यापैकी वीस पदवीधर झाली होती.

या मुलांमध्ये सुधारगृहासाठी आलेली मुले आहेत. या मुलांपैकी माध्यमिक शाळेत जाणारी, प्राथमिक शाळेत जाणारी, ट्रेनिंग कॉलेजमध्ये जाणारी व औद्योगिक शाळेत जाणारी मुले होती.

२०) सन १९२८ साली या वसतिगृहातून फक्त २ मुले मॅट्रिक परीक्षेत बसून पास झाली. तेव्हापासून या वसतिगृहातून मॅट्रिक. पास झालेल्या मुलांची उच्च शिक्षणाची सोय पुणे, मुंबई, कोल्हापूर, सांगली, बडोदा व बेळगाव येथे परिस्थितीनुसार व सवलती मिळण्यानुसार करण्यात येत असे. सन १९३७ साली या सातारच्या वसतिगृहातून महाविद्यालयात शिकणारी सुमारे ४५ मुले होती. त्यापैकी वीस पदवीधर झाली होती. या वसतिगृहातून समाज कार्यकर्ते, नेते तयार व्हावेत, हे ध्येय असल्याने, आपण केलेले संस्कार या पदवीधर मुलांत किती रुजले आहेत हे पाहण्यासाठी, व हे पदवीधर आपले अनुयायी म्हणून किती तयार होतात, हे पहाण्यासाठी द्वादश वार्षिक समारंभ धनिनीच्या बागेत महर्षी अण्णासाहेब शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली घेतला होता. ही भाऊरावांची तसेच मुलांचीसत्त्वपरीक्षा होती. भाऊरावांची अपेक्षा किमान १२ अनुयायांची होती. या समारंभासाठी या मुलांना चर्चा करून बोलावून घेण्यात आले होते. अठरा मुले हजर होती. भाऊरावांना कार्यकर्त्यांची आवश्यकता प्रकर्षाने जाणवत होती. कारण दोन वर्षांपूर्वीच सातारला प्राथमिक शिक्षकासाठी ट्रेनिंग कॉलेज सुरू केले होते. अठरापैकी पुढील दहाजण संस्थेचे आजीव सभासद राहिले. (१) नानासाहेब रामचंद्र माने (२) अब्दूलगनी दादामिया अत्तार (३) बाबुराव महादेव ठोके (४) शंकर ज्ञानदेव महादार (५) शांताराम भाऊराव काकडे (६) शंकर कृष्णाजी उनउने (७) रामकृष्ण वेताळ खैरमोडे (८) दिनकर रामचंद्र माने (९) आय. एम. एस. मुल्ला ( वकील) सातार्‍यात राहून वकिली करत विनावेतन मानसेवी सचिव म्हणून काम करीत राहिले. (१०) रामचंद्र मनोहर नलावडे (वकील) भाऊरावांच्या सम्मतीनेच राजकारणात पडले व नंतर राजकारण सोडून संस्थेचेच काम करीत राहिले. इतर आठ मुले भाऊरावांच्या संमतीनेच शासकीय सेवेत, राजकारणात व इतरत्र नोकरीस गेली. या आठ व इतरही मुलांना संस्थेबाहेर सेवेस जाऊ देण्यात भाऊरावांचा हेतू हा की, ते संस्थेबाहेर गेले तरी संस्थेच्या संस्कारांचे व ध्येयधोरणाचे पुरस्कर्ते, हितचिंतक खासच राहतील वतसेते राहिले.

२१) भाऊरावांनी पुढील दोन सालानंतर या तरुण पदवीधर शिष्यांवर वसतिगृहाचा व इतर शाखांचा कारभार सोपवून संस्थेचा व्याप वाढविण्यास ते मुक्‍त झाले.

२२) अनंत अडचणीतून या पदवीधर मुलांना स्वत:च्या मुलाप्रमाणे भाऊरावांनी वाढविले होते. त्यांच्या जेवणाखाणापासून ते फी भरण्यापर्यंतचा भार भाऊरावांनी वाहिला होता. भाऊरावांच्या जीवनातला हा मोठा आनंदाचा क्षण होता. कारण हे आजीव सभासद स्वाभिमानाने थोड्या वेतनावर काम करून संस्थेची शान वाढवीत तर होतेच, पण लाचारीही कधी दाखवीत नसत. म्हणूनच महर्षी अण्णासाहेब शिंदे म्हणाले को, कर्मवीर भाऊरावांना बारा वर्षांच्या अविरत समाजसेवारूपी अक्रोडाच्या झाडाची कमीत कमी १२ फळे चाखावयास, खावयास १२ आजीव सेवकांच्या रूपाने मिळाली. या स्तुतीने हुरळून न जाता भाऊरावांनी आपल्या नेहमीच्या स्वभावाप्रमाणे स्वत:पुढे दुसरे आव्हान उभे केले, ते पाहू या.

Hits: 439
X

Right Click

No right click