७. अक्रोडाची फळे - ६

Parent Category: मराठी पुस्तके Category: कर्मवीर भाऊराव पाटील

७. अक्रोडाची फळे - ६

१७) आता वसतिगृहातील दिनचर्या सांगितली म्हणजे या वसतिगृहात मुले ठेवण्यास पालकांना का आवडत असे हे कळेल. या
वसतिगृहासाठी पुढीलप्रमाणे ध्येय ठेवण्यात आले होते :
(१) वसतिगृहात दाखल झालेल्या मुलांना अतिशय कमी खर्चात प्रगतिकारक उदारमतवादी व परिणामकारक शिक्षण देणे,
(२) खेड्यातील चुणचुणीत व हुशार मुलांना अभ्यासक्रम पुरा करण्यासाठी सोयी उपलब्ध करणे,
(३) वसतिगृहात दाखल झालेल्या मुलांना एकत्र भोजन व निवास यातून जात, पंथ इ. भेद कृजिम व विनाशकारी आहेत हे पटवून ते नष्ट करण्यास मदत करणे,
(४) वसतिगृहाचे विशेष व महत्त्वाचे अंग म्हणजे स्वावलंबन व भ्रमाची प्रतिष्ठा मुलांत रुजवणे. त्यांना स्वत:ची निवासस्थाने व भांडीकुंडी
स्वत:च स्वच्छ करावयास लावणे. स्वप्नंपाक, बाजारहाट स्वत:च करणे आणि बागेत भाजीपाला पिकवून त्याची विक्री स्वत:च करणे, (५) आणि
रयतेच्या शिक्षणासाठी त्यागाने काम करणारे नेते व कार्यकर्ते तयार करणे.”

१९२७ मध्ये धनिनीच्या बागेत वसतिगृह आणल्यानंतर एकत्रित राहू लागलेल्या मुलांना पहाटे पाच वाजता घंटेच्या नादाबरोबर उठावे लागे.
पश्चिमेच्या बाजूस असलेल्या पत्र्याच्या पडवीत एकत्र जमून प्रार्थना झाल्यानंतर अभ्यासास बसावे लागे. या मुलांतून १० ते १२ मुलांचे गट
केलेले असत. त्यापैकी एका गटाकडे एक दिवसाचा स्वयंपाक करण्याचे काम असे; या गटास क्लब" म्हणत. उरलेल्या अभ्यास करणाऱ्या मुलांवर
भाऊरावांची देखरेख असे. मुलांमधून वयस्कर मुलास सेक्रेटरी व भोजन सेक्रेटरी निवडण्यात येई. भाऊरावांच्या गैरहजेरीत पहिला मुलगा मुलांच्या अभ्यासावर लक्ष ठेवी. भोजन सेक्रेटरी वसतिगृहासाठी लागणार्‍या बाजारहाटीवर लक्ष ठेवी.

१८) सकाळी साडेआठच्या दरम्यान नेमलेल्या गटास बागेत एक तासभर काम करावे लागे. रविवारी सर्व मुळे जादा काम करीत. जेवणात
ज्वारीची भाकरी, भाजी, आमटी व भात यांचा समावेश असे. पंधरवड्यातून एकदा गव्हाची खीर किंवा जमल्यास लाडू, भजी, भात व आमटी असे. प्रत्येकास स्वत:चे ताट, वाटी व तांब्या असे. ती भांडी त्यांना स्वत:च स्वच्छ करावी लागत. याशिवाय मुलांना धान्य, भाजी निवडावी लागे. भोजनासाठी पाळीप्रमाणे चटणी कुटावी लागे. मुळे विहिरीच्या पाण्याने आंधोळी करीत व कपडे धूत. विहिरीवर इंजिन व पंप होता. कोणीही नोकर. लावलेला नसे. भाऊराव परगावी देणग्या मिळविण्यासाठी व धान्यवसुलीस गेल्यावर सौ. लक्ष्मीबाई पाटील लहान मुलांच्यावर देखरेख ठेवीत. आजारीपणात मोठ्या मुलांच्या मदतीने औषधोपचार करीत.

ही बाग सुमारे अकरा एकर अडतीस गुंठ्यांच्या दरम्यान हती. बागेत आंबा, नारळ , फणस यांची झाडे होती. बागेतील नारळ, आामटीसाठी व चटणीत वापरीत. कोथिंबीरही तयार केली जात असे. आंब्याच्या दिवसांत मुले झाडावर चढून आंबे काढीत. या बागेत मध्यभागी मोकळी जागा होती. मुळे त्याचा .खेळण्यासाठी उपयोग करीत. परीक्षेच्या दिवसांत मुले आंब्याच्या व फणसाच्या सावलीत अभ्यास करीत धनिनीव्यां बागेतील हे वसतिगृह एक मुक्‍त विहाराचे रमणीय ठिकाण होते. म्हणून पुढे या वसतिगृहास मान्यताप्राप्त सुधारगृह म्हणून तत्कालीन शासनाने मान्यता दिली व बालगुन्हेगारांना शिक्षणासाठी येथे पाठविळे जात असे. या वसतिगृहात आलेली ही मुले येथील रम्य वातावरणात तात्काळ रमून जात व पळून जाण्याचे नाव घेत नसत.

Hits: 336
X

Right Click

No right click