३, भाऊरावांचे शिक्षण व जडणघडण -२

Parent Category: मराठी पुस्तके Category: कर्मवीर भाऊराव पाटील

गणिताचे शिक्षक श्री. भार्गवराम यांना गणितात पास करण्याबद्दल सांगून पाहिले. भार्गवराम कुळकर्णी अतिशय तत्त्वनिष्ठ व प्रांजल शिक्षक होते. ते महाराजांना म्हणाठे, “ महाराज, हा भाऊ ज्या बाकावर बसतो, त्यास पाहिजे तर वरच्या वर्गात घालतो; पण या भाऊस नाही. दोनशेपैकी सात मार्क्स ज्यास मिळतात त्यास अधिकचे मार्कस्‌ देऊन पास करण्यात मुलांचे भठे इच्छिणार्‍या माझ्यासारख्या शिक्षकाचा तो अप्रामाणिकपणा ठरेल. माझ्या सदसद्विवेकबुद्धीस ते पटत नाही. हवे तर आपण मला नोकरीतून कमी करा.” शाहू महाराज श्री. भार्गवराम कुळकर्ण्याच्या या बोलण्याने समाधान पावले. महाराजांनी त्यांना बढतीच्या जागेवर नेमले. भाऊराव मात्र विरमला. पण या कुळकर्णी गुरुजींची त्याने सतत आठवण ठेवली. ही
घटना सातारच्या आपल्या वसतिगृहातील मुलांना सांगून भाऊराव त्यांना अभ्यासामध्ये पगकाष्ठा करावयास लावीत. नापास झाल्यानंतर मॅट्रिकच्या वर्गात जाण्यास न मिळाल्याची रुखरूख भाऊरावापेक्षा त्याच्या मातापित्यांना जास्त वाटली. १९०८-५९ हे साल राजवाड्यावर राहून कुस्तीत घालविले. शिक्षणात खंड पडल्याने भाऊरावाच्या वडिलांनी त्यास करिगावठा परत बोलाविले. या शेवटच्या वर्षातील कोल्हापुरातील महाराजांच्या सान्निध्याने भाऊरावास भावी सामाजिक व शैक्षणिक
कार्यासाठी भक्कम प्रेरणा दिली, नव्हे भावी समाजसुधारक घडविला गेला यात शंका नाहो. विद्यार्थिदशेत कोल्हापुराती” सस्कारामुळे भाऊराव स्पृश्यास्पुश्य खझ रूढीचा किती तिरस्कार करीत होते हे खालील घटनांदरून दिसून येते. भाऊरावांचे वडील कऱ्हाडला नोकरीवर असताना ब्राह्मण मंडळी जेनांचा स्पर्शसुद्धा निषिद्ध मानीत. मातोडी गंगाबाईना ब्राह्मणांच्या पाणवठ्यावर पाणी भरण्यास अटकाव करीत. सुट्ठैत घरी आल्यावर एके दिवशी संतापलेल्या भाऊरादाने आईच्या हातातील घागर घेऊन ब्राह्मणाच्या विरोधास न जुमानता, एण्याने घागर भरून घेतली. विट्यास असताना अस्पृश्यांना पाणी न देणार्‍या, अस्पृश्यांचा दिटाळ मानणार्‍या विहिरीच्या मालकाचा विहिरीवरील रहाट मोडून फेकून दिला. भाऊरावाच्या
मूळच्या धाडसी बंडखोरपणास शाहू महाराजांच्या सान्निध्यात अधिक धार आली.
| ८) राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूरची राज्यसूत्रे १८९४ साली हाती घेतली. वेदोक्त प्रकरणानंतर राजकीय, सामाजिक व शैक्षणिक सुधारणा संस्थानात करण्याचे त्यांनी ठरविले. त्याची सुरुवात संस्थानच्या शासनात स्थानिक लोकांना शक्‍यतो प्राधान्य देण्याने केली. त्याबरोबर सत्तेचा समतोल राखण्यासाठी सर्व जाती-जमातीच्या लोकांना संस्थानांतील व त्यांच्या खाजगीकडील नोकऱ्यांत स्थान देण्यास सुरुवात केली. त्यातूनच स्थानिक असलेल्या अण्णासाहेब लट्ट्यांना श्री. थोरो या
इंग्रजाऐवजी राजाराम महाविद्यालयात प्राध्यापक नेमले. स्थानिक सुशिक्षित तरुण संस्थानात नोकऱ्यासाठी मिळावेत म्हणून जातीनिहाय वसतिगृहे सुरू केली हे यापूर्वी सांगितले आहेच. मागासलेल्या संस्थानी प्रजेसाठी ५०% नोकऱ्या राखीव करण्याबरोबर अस्पृश्य समाजातील सातवी पास झालेल्या तरुणांना मराठीचा उपयोग करून कोर्टात वकिली करण्यासाठी सनदा . दिल्या. अभ्यासात कच्चे असलेल्या अस्पृश्यांसाठी मिस क्लार्क वसतिगृहासोबत विशेष अभ्यासवर्ग सुरू करविला. या मुलांना आर्थिक मदतीची सोय केली. अस्पृश्यांच्या पुढाऱ्यांना सहभोजनाचा लाभ दिला.
राजवाड्यावर दारवान, कुत्तेवान, माहूत व इतर काही मोक्याच्या जागांवर भटक्या, गुन्हेगार जमातीसह अस्पृश्यांना नेमणुका दिल्या. आपल्या राजकन्येच्या विवाहाप्रसंगी त्यांना तरवारी धारण करून विशेष पोषाखात अभ्यागतांच्या स्वागताचे काम दिठे. सन १९०२ ते १९०९ पर्यंत भाऊरावांनी शाहू महाराजांच्या या सामाजिक सुधारणांचा प्रयत्न प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिला होता. राजवाड्यावर राहिल्यानंतर महाराजांच्या विशाल अंतःकरणाचा अनुभवही घेतला होता. म्हणून सातारला छत्रपती शाहू
बोर्डिगच्या नामकरणप्रसंगी ते महात्मा गांधींना म्हणाले, 'महाराजसे मैंने पैसा नहीं लिया, लेकिन उनका बडा दिल लिया है)
९) भाऊरावांनी १९०९ मध्ये कोल्हापूर सोडताना शाहू महाराजांकडून समानतेची शिकवण व मागासलेल्या अस्पृश्य, भटक्या व : गुन्हेगार जमातीविषयी अपार करुणेने भरलेले मोठे अंत:करण बरोबर

Hits: 311
X

Right Click

No right click