९. एका पराङमुख मित्रास

Parent Category: मराठी पुस्तके Category: स्वातंत्र्यवीर सावरकर समग्र कविता

९. एका पराङमुख मित्रास

(आर्या गीति)

हा मित्र मित्रश्रेष्ठा ! प्रेमभरें करित हें तुला नमन
निन्दु नको, अर्पाया कधिं ढळलों सख्य हें तुला नमन ॥१ ॥

विसरूनि कृतापराधा निन्दुनि सभ्यास, माळवुनी रसना
यश काय जोडिले त्वां सुधिमत वच वद, असत्य नीरसना ॥ २ ॥

मित्रद्रोह न केला आम्हि, वदा सत्य हें, तुवा केला
गेलासि स्पर्धेने धरूनि महत्व हेतु वा केला ॥३ ॥

अुपदेश मज न करणें आपणाची मित्रधर्म सांभाळा
वर्तन अुपदेशाला दे शोभा, तिलक तो जसा भाला ॥ ४ ॥

टपलास मित्रदोषा लक्षाया तूं जई सदा वकसा
ह्या बोधाचा ताई तव हृदयावर राहिला न दाब कसां ॥५ ॥

सकलां प्रिय, अप्रिय तुज तुजविण जन सर्व सख्य मशिं करितो
कीं सकल मोददायी कानिजनांना असह्य शशिकर तो ॥ ६ ॥

जरि वरि न दाविं तरि मन अंतरिं आत्मा खराच लकलकतो
कपटाभिमानविलगलित वागावे, धर्म हा सकळ कळतो ॥ ७ ॥

अपराध तुझे असती तैसा मीं ही असेन अपराधी
अन्योन तयां विसरू त्वद्विजयीं मम असे न अपराधी ॥ ८ ॥

सुज्ञचि अससी तूंते म्यां मूढें काय बोध शिकवावा
हंगाम सुखाचा सद्गर्तनजल शिंपडोनि पिकवावा ॥ ९ ॥

Hits: 457
X

Right Click

No right click