हिंदुस्थानची सद्य:स्थिती : अन्योक्तित्रय

Parent Category: मराठी पुस्तके Category: स्वातंत्र्यवीर सावरकर समग्र कविता

(४) हिंदुस्थानची सद्य:स्थिती : अन्योक्तित्रय-

१. शुकान्योक्ति
(मालिनी)

वनिंउुपवनिं ज्याही रम्य वक्षां वरीले ॥
सुफल सरस तोया मज्ञरीते वरीले ॥
अुडुनि पडुनि घेतो बैठका साजऱ्याही ॥
अहहह! शुकसा तो पिंजरीं आज राही ॥१ ॥


२. कोकिलान्योक्ति
(मालिनी)

डुलत तरूवरांच्या अुच्च भागी तगावें ॥
पवनसमयिं झोंके घेत सद्गीत गावें ॥
युवति भंवतिं याव्या शोभना आयकाया ।
पिक अजि तव टोची काक रे हाय काया ॥ १॥


३. कमलान्योक्ति
(मालिनी)

सुरतनु- धवलांगी जाहूवी ज्यास वीते ॥
स्वकर शिणवुनीयां मानिलें ज्या सखीतें ।।
सकल सुरवरांच्या आरुढे शीर्षभागी ।॥।
कमल सुकुनि गेले हाय रानीं अभागीं ॥ १ ॥


(५) स्वातंत्र्यदेवीस वंदन
(शार्दूलविक्रीडित)

जीच्या धन्य पदारविन्दमकरन्दा स्वादण्या झुंजती ॥
श्रीमतूत्र्यंबक अंबरेश अलिसे गुंजारवा गुंजती ॥
वंद्या मानिति अंबिकादितिरमानंगांकसंगास त्या ॥
श्री मांगल्य शिवप्रदेसि नमितो स्वातंत्र्यदेवीस त्या 1 १ ॥

Hits: 318
X

Right Click

No right click