चाफेकर नि रानडे यांजवरील फटका - ७

Parent Category: मराठी पुस्तके Category: स्वातंत्र्यवीर सावरकर समग्र कविता

चाफेकर नि रानडे यांजवरील फटका - ७

हांजी हांजी करी सर्वदा राजी म्लेंच्छांच्या कृतिला ।
पोटासाठी खटपटतो परि सुष्ट गमे परभूपतिला ॥ १

पारतंत्र्यपंकांत देश जो बुडवी त्याप्रति नृप म्हणती ।
कडक दंड जो दे त्या छलका राजद्रोही त्या म्हणती ॥ २

अुदात्त ज्याचे विचार, धाडस विशाल, देशप्रीति मनी ।
खुनी बनत तो न्याय-प्रहसनी, हाय! हाय! मग होत जनीं ॥ ३

तिळहि नसे की फाशी झाली यामधि दु:खाला वसती ।
देशपिता त्या खुनी म्हणतसा ह्यासचि सज्ञन बहु हसती ॥४

न्यायाधीशचि जोशी अुत्तम अुदयमुहूर्ता योग्य गणी ।
सत्य, देशहित, वऱ्हाड जमले कीर्तिनीति ह्या वऱ्हाडणी ॥ ५

टिळक-गजानन नमस्कारिला फास-बोहलें मग पुरलें ।
स्मरले गीतामंत्र 'दामुने' मुक्ति नवरिला हो वरिलें ॥ ६

लग्न-सोहळा विचित्र दावी चित्र भीतिचें किती बडें ।
सूड अुगविण्या वासुदेवहृदयांत भयंकर कोप चढे ॥ ७

Hits: 327
X

Right Click

No right click