चाफेकर नि रानडे यांजवरील फटका - ४

Parent Category: मराठी पुस्तके Category: स्वातंत्र्यवीर सावरकर समग्र कविता

चाफेकर नि रानडे यांजवरील फटका - ४
(जाति : स्वरगंगा)

विनयशालिनी विनयधारिणी आंग्लां म्हणति कि यशवंती ।
राणी त्यांची विजया विजयी भाग्यशालिनी अवंती ॥१

चिरायुरारोग्याला भोगी तिचा महोत्सव ते करिती ।
योग्यचि समया छळक वधाया मुहूर्त सारे हे धरिती ॥ २

स्वजन-छलन हरणाला झाले सज्ञ अर्पण्या देहाला ।
मोहाला ठोकुनी प्रणामा, निघती त्यागुनि गेहाला ॥ ३

वीरश्रीने शोभित झाली सत्यपालने हर्षवती ।
तारुण्याने सतेज, दैवी स्फूर्ति संचरे हृदेनवती ॥ ४

लालभडक ते नेत्र, बंधुवर बाळकृष्ण दे धीर मना ।
श्री दामोदर सिद्ध जाहला जायालागी खलदमना ॥ ५

कान्ता वदली, 'कान्ता, जाचा देशहिताला करावया ।
पतिराया, घ्या निरोप जावें त्वरित कीर्तिला वरावया' ॥ ६

पवन जवन परि मागे सारित 'गणेशखिंडी' प्रति आला ।
कालासम मग समय साधितो घालायाला तो घाला ॥ ७

भक्ष्य रँड बहु मस्त देखता सिंह धावला बगीकडे ।
गोळी सुटली, गडबड मिटली, दुष्ट नराधम चीत पडे ॥८
----

विजया- व्हिक्टोरिया

Hits: 282
X

Right Click

No right click