चाफेकर नि रानडे यांजवरील फटका - ३

Parent Category: मराठी पुस्तके Category: स्वातंत्र्यवीर सावरकर समग्र कविता

चाफेकर नि रानडे यांजवरील फटका - ३
(जाति : स्वरगंगा)

हाल हाल बहुकाल करोनि चार मांडिले हवे तसे ।
छळुनि सोडिली सकल प्रजा मग 'खून' पडे हें नवल नसे ॥ १

अबलाबाला बालांचे ह्या शाप सहस्त्रावधि होती ।
करिता गमते कृती गोड जी भरिता कडवट कां होती? ॥२

धमज्ञिला ईशाज्ञेला समाज-कर्तव्याला हो ।
पाळोनीया प्राणा द्याया सिद्ध, तयांचा शुभ लाहो ॥ ३

स्वजनछळाला ऐकुनी होती तप्त तरुण ते अरुण जणो ।
देशासाठी प्राणा देती धन्य धन्य त्यां कां न म्हणो? ॥ ४

परस्परांमधि विचार करिती अपाय वदती मग सुचला ।
अरे, रँड हा अधम, ह्यासची वधू चला रे चला चला ॥५

अरे, कांच हा मनीं डाचतो, जाच असह्यच लोकांना ।
पोचट देखुनि नाचविती हे काळ भासती कैकांना ॥ ६

शतावधी ते जन्मा येती मरोनि जाती ना गणती ।
देशासाठी मरती त्यांसी देशपिते कीं बुध म्हणती ।॥ ७

वरू वरू झडकरी मरण तें जरी अमरची असें घडे ।
अनोन्यांमधि बोलति की मग गरुडपतीची जोड जडे ॥ ८

X

Right Click

No right click

Hits: 331
X

Right Click

No right click