लोकनाट्याचे जनक - शाहीर अण्णा भाऊ साठे भाग - ८

Parent Category: मराठी पुस्तके Category: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

अण्णा भाऊंनी तमाशाचे केवळ नावच बदलले नाही तर त्याचे अंतरंगही पार पालदून टाकले. पारंपरिक तमाशात गण, गवळण, बतावणी, सवालजबाब, वग असे घटक असतात. 'गणा'मध्ये गणेशवंदन आणि गणेशस्तवन असते. अण्णा भाऊंनी ही परंपरा मोडून "पहिल्या नमना'चा मान मातृभूमी, हुतात्मे, राष्ट्रपुरुष यांना देण्याचे बहुमोल काम केले.

प्रथम मायधूच्या चरणा
छतवणएती शिक्बा चरणा
स्मरोनि गातो कवना ॥

म्हणणाऱ्या अण्णा भाऊंनी एक अभिमानास्पद बदल करून आपल्या राष्ट्रप्रेमाला साद घातलीच; परंतु तमाशाकडे, अगदी आरंभापासून पाहण्याची, एक नवी दृष्टी दिली.

गणानंतर येत असे गवळण, परंतु मथुरेच्या बाजाराला निघालेल्या गवळणी आणि त्यांना अडविणारी कृष्ण-पेद्याची जोडगोळी यांना अण्णा भाऊंनी वगळूनच टाकले.

कारण त्या संवादांतून मनोरंजन होत असले तरी त्यात पांचटपणा आणि अश्लीलताच अधिक असे. 'समाजपरिवर्तनासाठी आणि क्रान्तीसाठी लोकरंजनापेक्षाही लोकशिक्षणाची आवश्यकता असते हे भान ठेवून अण्णा भाऊंनी लावणी आणि तमाशा या रंजनकलेला लोकशिक्षणाकडे वळविण्याचा प्रयत्न केला!' डॉ. सदा कऱ्हाडे (लोकराज्य १ नोव्हेंबर १९९३) यांनी मांडलेले हे मत अशा बदलांवरूनच सिद्ध झाले आहे.

गणानंतर सरळ वगच सादर करण्याची कालानुरूप प्रथा अण्णा भाऊंनी सुरू केली. वगाच्या प्रारंभीच असलेल्या 'म्हणणी*तून कथानकाचा परिचय प्रेक्षकांना करून देऊन त्यांची उत्सुकता वाढविण्याचे काम त्यांनी सुरेख साधले. वगामध्ये येणारी परंपरागत राजाराणीप्रधान ही पात्रे बदलून त्या जागी शेतकरी-सावकार, कामगार-पुढारी अशी प्रेक्षकांच्या दैनंदिन परिचयाची वास्तव पात्रे आणली. पुराणातील कथा किंवा राजाराणींच्या काल्पनिक कथांची जागा काळाबाजार, सावकाराने केलेली कर्जदाराची नाडणूक, गिरणीकामगारांचे शोषण, पुढाऱ्यांच्या भूलथापा, निवडणुकीतील हिडीस राजकारण यांना देऊन अण्णा भाऊंनी क्रांतिकारक बदल केला आणि तो बहुजनसमाजात अतिशय रुचला. ही वस्तुस्थिती कुणालाच नाकारता येणार नाही.

तमाशा म्हणजे ख-या सौंदर्याचे मांडलेले प्रदर्शन आणि लावण्या म्हणजे त्या सौंदर्याचा केलेला जास्तीत जास्त उन्मादी आविष्कार; हो व्याख्याच बदलून टाकण्याचे धाडसी पाऊल अण्णा भाऊंनी आपल्या लोकनाट्यांमधून टाकले, या काळात लोकनाट्यात स्त्रीपात्रे येतात ती शेतकऱ्याची बायको किंवा कामगाराची बायको म्हणून.

आपले ठसकेबाज संवाद खणखणीतपणे सादर करण्याचे काम ही स्त्रीपात्रे करतात तेव्हा
"तमाशातील कलावती? म्हणून त्यांच्याकडे न पाहता लोकनाट्यातील एक आवश्यक पव म्हणूनच प्रेक्षक पाहतात, याचा इथे उल्लेख करायलाच हवा. तमाशातील सरीला *लोकनाट्या'त आणताना अण्णा भाऊंनी तिचा सन्मान किती अबोलपणे आणि सहजपणे वाढविला आहे!

शेतकरी, कामगारांच्या समस्या व अडचणी, दलित-पीडित-शोषितांच्या व्यथावेदना त्यांनी चटपटीत आणि हृदयस्पर्शी संवादांतून श्रोत्यांपुढे मांडल्या आणि श्रमिकांच्या एकजुटीचे सामर्थ्य, अन्यायाचा प्रतिकार करू शकणारी संघटित शक्ती आणि विषमतेच्या पलीकडे नेऊ पाहणारा साम्यवादी विचार त्यांनी जनतेपुढे ठेवला. अण्णा भाऊंनी लोककलेचा उपयोग साम्यवादाच्या पक्षीय प्रचारासाठी केल्यामुळे त्यांच्या लेखनसामर्थ्याला मर्यादा पडल्या अशी टीका त्यांच्यावर केली गेली. 'ते स्वत: काळावर आरूढ झाले; पण त्यांची लोकनाट्ये मात्र पक्षीय अभिनिवेशामुळे काळाच्या मागेच राहिली' असे मत पां. तु. पाटणकरांनी (अण्णा भाऊ साठे संदर्भग्रंथ) नोंदविले आहे आणि ते काही मंडळींना पटण्याचीही शक्‍यता आहे. परंतु त्याचवेळी डॉ. सदा कऱ्हाडे यांचे मतही विचारात घ्यायला हवे.

'ऐतिहासिक दृष्ट्या शाहिरी आणि तमाशा या दोन भिन्न कला मानल्या गेल्या.
वीररसप्रधान तो शाहिरी आणि शृंगाररसप्रधान तो तमाशा.
समाजपरिवर्तनाशी व राजकीय क्रान्तीशी तादात्म्य पावून समाजातले चैतन्य फुलविण्याचे कार्य शाहीर करतो, तर शृंगाराचे आकर्षण ठेवून जनमानसातील विकारांना चेतविण्याचे कुशल कार्य तमासगीर करतो, असा परंपरागत समज होता. परंतु अण्णा भाऊंनी हा समजच बदलून टाकला. तमाशाची रंजनकलाही लोकशिक्षणाकडे वळविता येते, हे भान ठेवून त्यांनी नवे तमाशेही लिहिले.

मनोरंजनातून समाजप्रबोधन कसे करता येते याचा वस्तुपाठच खरे तर अण्णा भाऊंनी समाजापुढे ठेवला. याबाबतची मतभिन्नता गृहीत धरूनही एवढे मात्र निश्चितच म्हणता येईल की लोककलेला कालानुरूप करण्याचे ऐतिहासिक मोलाचे कार्य करून अण्णा भाऊ साठे 'लोकनाट्याचे जनक' ठरले आणि त्यांचे ते स्थान ध्रुवतार्‍्याप्रमाणे अढळच राहील.

Hits: 645
X

Right Click

No right click