लोकनाट्याचे जनक - शाहीर अण्णा भाऊ साठे भाग - ७

Parent Category: मराठी पुस्तके Category: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

तमाशा हा ग्रामीण महाराष्ट्राच्या लोकजीवनाचा अविभाज्य घटक आहे. साऱ्याच लोककलांविषयी असे म्हणता येईल. १९व्या शतकाच्या अखेरीला मुंबईसारख्या शहराला बाळसे आल्यावर, जामीण महाराष्ट्रातून गरिबीने गांजलेल्यांचे लोंढे मुंबईकडे येऊ लागले. आपल्या 'काळ्या आई'ला आणि कुटुंबियांना गावाकडेच ठेवून शहरात आलेली ही बहुसंख्य मंडळी गिरण्यांमध्ये भरती होऊन 'गिरणगावा'त एकमेकांना धरून राहिली, गिरणीनजीकच्या झोपडपट्ट्यांच्या आश्रयाला गेली. 'गिरणोदया'शी जमवून घेण्याचा प्रयत्न ती मंडळी करीत असली तरी त्यांच्या मनाचा सांधा गावाशीच जोडला, अशा मंडळींवैकीच एक असलेले, मोरबाग मिल्समध्ये ए्वणारे अण्णा भाऊ गिरणगावच्या, गिरणीकामगारांच्या नव्या समस्यांना सरावत होते, शोषणाला सामोरे जात होते. श्रमिकवर्गाच्या शोषणाला वाचा फोडून, त्यांच्या संघटित शक्तीला जागृत करणारे *लाल बावट्या'चे साम्यवादी विचार ऐकत होते, पचवीत होते. अशावेळी बालपणापासून ज्यांची संगत लाभली त्या लोककलांच्या, मुख्यत: तमाशाच्या, नव्या रूपाचा साक्षात्कार अण्णा भाऊंना झाला. या संदर्भात डॉ. सदा कऱ्हाडे यांनी 'अण्णा भाऊ साठे संदर्भ ग्रंथा'तील आपल्या लेखात मांडलेले विचार उद्धत करणे आवश्यक आहे. ते म्हणतात,

“परंपरागत तमाशाची सुरावट घेऊन अण्णा भाऊंनी शाहिरीची नवी सजावट केली. या अर्थाने कौ, पोवाडे, लावण्या, गौते, गण, वग इत्यादी रचनाबंध त्यांनी स्वीकारले, परंतु त्यात नवा आशय भरला. हा नवा आशय समकालोन होता, वास्तवाधिष्ठित होता. तसाच भविष्यदर्शीही होता. त्यामुळे या परंपरागत कलेला नवी प्रतिष्ठा मिळाली. शाहिरीची ही नवी सजावट *लोकनाट्य' या अर्थपूर्ण नावाने ओळखली गेली. शाहीर अण्णा भाऊ साठे यांचा कलावन्त म्हणून आदर करायचा तो लोकनाट्याचे प्रवर्तक म्हणूनच.”

इथे 'लोकनाट्य' या नावाविषयी सांगायला हवे. पां. तु. पाटणकर यांनी *लोकराज्य'च्या 'लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विशेषांका'त (१ नोव्हेंबर १९९३) सांगितलेली आठवण थोडक्यात अशी : संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ऐन भरात आली होती. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचो योजना जोर धरत होती. अशावेळी 'लाल बांबटा कलापथका'दवारे शाहीर गव्हाणकर, शाहीर अमर शेख आणि शाहीर अण्णा भाऊ साठे ही त्रयी उभा महाराष्ट्र जागवीत आणि गाजवीत होती. कलापथकाच्या तमाशांना हजारोंनी माणसे बैलगाड्या जोडून येत होती. मुंबईत मैदाने तुडुंब भरत होतो. त्यामुळे चवताळलेल्या मोरारजीभाई देसाई यांनी तमाशावर बंदी घातली! त्यावर अण्णा थाऊंनी डोके लढवले.

त्यांनी 'माझी मुंबई' हा वग लाखोंच्या समुदायापुढे सादर करताना आरंभी जाहोर केले की मायबाप सरकारने तमाशावर बंदी आणली आहे, म्हणून आज आम्ही आपल्यासमोर माझी मुंबई' हे लोकनाट्य सादर करीत आहोत! टाळ्यांच्या कडकडाटात आणि पोलिसांच्या उपस्थितीत तमाशाचे 'लोकनाट्य' असे बारसे करण्याचे एक ऐतिहासिक क्वार्य अण्णा भाऊंनी केले ब आपल्या मिश्किलपणाने त्यांनी शासनाला हात चोळीत बसायला लावले.

Hits: 566
X

Right Click

No right click