Designed & developed byDnyandeep Infotech

विंदा करंदीकर

Parent Category: व्यक्तिपरिचय

विंदा करंदीकर हे मराठीतील एक प्रमुख नवकवी होत. त्यांचे संपूर्ण नाव गोविंद विनायक करंदीकर असे आहे. त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्यातील घालवली या गावी इ.स. १९१८ मध्ये झाला. त्यांचे शिक्षण कोल्हापूर येथे झाले. त्यांनी मुक्त सुनीतांचा केलेला प्रयोग हे या प्रयोगशीलतेचे एक उदाहरण होय. त्यांच्या ‘माझ्या मना बन दगड’ यांसारख्या अनेक कवितांमधून त्यांची समाजवादी तत्वज्ञानावरील निष्ठा व्यकत होते. मराठीतील महत्वाचे समीक्षक म्हणूनही त्यांना मान्यता मिळाली आहे. लघुनिबंधकार म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत .करंदीकरांना सर्वोच्च पातळीवरील राष्ट्रीय कवी म्हणून ‘कबीर पुरस्कार’आणि ‘कालिदास पुरस्कार’ हे मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

ग्रंथसंपदा : स्वेदगंगा, जातक, विरुपिका, संहिता इत्यादी काव्यसंग्रह. स्पर्शाची पालवी, आकाशाचा अर्थ इत्यादी ललित लेखसंग्रह. परी गं परी, राणीचा बाग, इत्यादी बालगीतसंग्रह. किंग लियर, फ़ाऊस्ट इत्यादी अनुवादित ग्रंथ.

X

Right Click

No right click