Designed & developed byDnyandeep Infotech

वि.स.खांडेकर

Parent Category: व्यक्तिपरिचय

वि.स.खाडेकर यांची मराठीतील एक लोकप्रिय साहित्यिक म्हणून गणना केली जाते .वि.स. खांडेकर यांचे संपूर्ण नाव विष्णू सखाराम खांडेकर असे होते. त्यांचा जन्म १८९८ मध्ये सांगली येथे झाला. त्यांचे शिक्षण पुणे व सांगली येथे झाले. मराठीतील श्रेष्ठ कांदबरीकारांपैकी ते एक होते. वि.स. खांडेकर यांनी आपल्या साहित्यसेवेचा प्रारंभ कथालेखनापासून केला. त्यांनी अनेक लघुकथा व रुपकथा लिहिल्या आहेत. इ.स.१९३० मध्ये ‘हृदयाची हाक’ ही पहिली कांदबरी त्यांनी लिहिली.
खांडेकरांनी छाया, ज्वाला, देवता, अमृत, माझं बाळ, इत्यादी चित्रपट लिहिले असून त्यापैकी काही चित्रपट गाजले होते. खांडेकर हे जीवनवादी साहित्यिक म्हणून ओळखले जातात.‘जीवनासाठी कला’हा साहित्यातील पक्ष त्यांनी उचलून धरला होता.


ते साहित्य अकादमीचे फ़ेलो होते. त्यांच्या ‘ययाती’या कांदबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला होता. भारत सरकारने इ.स.१८६८ मध्ये ‘पद्‍मभूषण’ हा किताब देउन त्यांचा गौरव केला होता .भारतीय ज्ञानपीठातर्फ़े १९७४ मध्ये ‘ज्ञानपीठ’पारितोषिक त्यांना मिळाले होते.


ग्रंथसंपदा : हृदयाची हाक, कांचनमृग, हिरवा चाफ़ा, दोन मने, रिकामा देव्हारा, उल्का, सुखाचा शोध, पहिले प्रेम, पांढरे ढग, ययाती, अमृतवेल इत्यादी कांदबर्‍या. कालची स्वप्ने, नवा प्रात:काल, ऊनपाऊस, दत्तक आणि इतर गोष्टी, प्रसाद, जीवनकला, स्त्री-पुरुष, पाषाणपूजा इत्यादी कथासंग्रह. चांदण्यात, वायुलहरी, सायंकाळ, मझधार, झिमझिम, कल्पकता इत्यादी लघुनिंबधसंग्रह. याशिवाय काही रुपकथासंग्रह, टोपणनावाने लिहिलेल्या काही कविता, रंकाचे राज्य हे नाटक, काही टीकात्मक लेखनाचे ग्रंथ यांचाही त्यांच्या साहित्यात समावेश होतो.

X

Right Click

No right click