माझे परदेशगमन भाग - 3

Parent Category: मराठी साहित्य Category: लेख Written by सौ. शुभांगी रानडे

पॅरीसच्या विमानतळावर check-in करतानाची सुरक्षा व्यवस्था पाहिली आणि लगेच मुंबई विमानतळावरची सुरक्षाव्यवस्था आठवली. पॅरीसमधे सुरक्षा तपासणीच्या वेळी प्रथम तुम्हाला चप्पल, बेल्ट, पर्स, पाकीट, मोबाइल सकट सगळ्या गोष्टी (कपडे सोडून) टेबलावर काढून ठेवाव्या लागतात, त्यानंतर वैयक्तिक तपासणी होते आणि मगच तुम्हाला आत जाण्याची परवानगी मिळते. अशा सगळ्या सुरक्षा चक्रातुन बाहेर पडून एकदा आम्ही तिकीटावर शिक्कामोर्तब करून विमानात जाउन बसलो. Paris-Houston Boeing 777 या विमानाने आम्ही आमचा पुढचा १०.३० तासाचा प्रवास करणार होतो. अर्धा प्रवास तर झाला पण अर्धा अजुन शिल्लक होता... आणि तो सुद्धा दिवसाचा, म्हणजे आजिबात झोपायचे नाही..नाहीतर jetlag.

Hits: 774
X

Right Click

No right click