बा भ. बोरकर

Parent Category: व्यक्तिपरिचय Category: साहित्यिक Written by सौ. शुभांगी रानडे

बा.भ. बोरकर हे एक सौंदर्यवादी भावकवी म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचे संपूर्ण नाव बाळकृष्ण भगंवत बोरकर असे होते. त्यांचा जन्म गोव्यातील कुडचडे या गावी इ.स. १९१० मध्ये झाला. बोरकरांचे शिक्षण गोव्यात आणि धारवाड येथे झाले. मराठीतील ‘आमचा गोमंतक’ आणि कोकणीतील ‘पोर्जेचा आवाज’या वृत्तपत्रकांचे संपादक म्हणूनही त्यांनी काम केले होते. ‘प्रतिभा’ हा बोरकरांचा पहिला काव्यसंग्रह होय. कोकणी भाषा हा बोरकरांच्या अस्मितेचा आणखी एक विषय होता. कोकणीला स्वतंत्र भाषेचा दर्जा मिळावा, असा त्यांचा आग्रह होता .भारत सरकारने ‘पद्‍मश्री ’ हा किताब देउन त्यांचा गौरव केला होता. गोव्याच्या स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतल्याबद्दल त्यांना ताम्रपट मिळाला होता.

ग्रंथसंपदा : प्रतिभा, जीवनसंगीत, आंनदभैरवी, चित्रवीणा, चैत्रपुनव, गिटार, दूधसागर, कांचनसंध्या इत्यादी काव्यसंग्रह .भावीण, प्रियकामा, या कांदबर्‍या इत्यादी.

Hits: 579
X

Right Click

No right click