६५. कोल्हापूर १९९२ - रमेश मंत्री

गेल्या ६० वर्षात मराठी साहित्याच्या अंतरंगात विस्मयकारक व हितकारक बदल घडले. मराठी भाषिक लेखकांनी इतर भाषिकांशी पण आदानप्रदान संबंध ठेवावेत. यामुळे मराठी लेखकंच्या जाणिवेच्या कक्षा रुंदावतील. दूरदर्शनवर दोन प्रकारे ग्रंथपरिचयाचे कार्यक्रम आखावेत. दर महिन्यातून एकदा १५ नव्या ग्रंथांचा त्रोटक परिचय करून देण्यात यावा. तसेच महिन्यातून एकदा तरी दोन किंवा तीन नव्या पुस्तकांचे रसग्रहण करण्यात यावे. गावोगाव ग्रंथप्रदर्शने भरवावीत. गाव तेथे ग्रंथालय अशी योजना असावी. ज्ञानगंगा गावोगाव जावी. जीवनातील अत्यंत उदात्त अनुभव वाचकाला देऊन त्यांच्या भावनांचे शमन करण्याचे काम साहित्य करते. श्रेष्ठ साहित्यवाचनाने आपली जीवनादृष्टी उदार, जिव्हाळ्याची व सहृदय बनते. मन संस्कारक्षम बनते. साहित्याने जे मानसिक समाधान मिळते ते इतर कोणत्याही क्षेत्रात मिळत नाही.

Hits: 623
X

Right Click

No right click