६३. पुणे १९९० डॉ. यू. म. पठाण

संतसाहित्याचा अंतर्भाव प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन व विद्यापीठीय स्तरांवर काही प्रमाणात केला जातो. पण त्याबद्दल अरुची, अनास्था वाटता कामा नये. कारण या साहित्याने समाज एकसंध केला, मानवतेचा नि समतेचा संदेश दिला. संतसाहित्यात मानवी मनावर सुसंस्कार करण्याचं, समाजप्रबोधन करण्याचं, समाजात मानवतावादी दृष्टिकोन निर्माण करण्याचं, आचारविचारातील शुचित्वाचा संदेश देण्याचं अपार सामर्थ्य दडलेलं आहे. त्यामुळे ते समजाला दिशा दाखविण्याचे काम कारणारे एक महान तत्त्व म्हणून चिरंतन स्वरूपात टिकून राहील.<br /> मध्ययुगीन साहित्यानंतर विविध आधुनिक साहित्यप्रवाहांनी मराठी वाङ्मयाची अनेक दालनं संपन्न झाली. बालसाहित्यकारांनाही वाङ्मयाच्या प्रांतात मानाचं स्थान मिळायला हवे. बालवाचक हा फार मोठा वाचकवर्ग आहे. त्यांच्यात उत्कृष्ट साहित्याची अभिरुची निर्माण करणं हे बालसाहित्यकारांपुढचं मोठं आव्हान आहे. अन्य भाषातील उत्कृष्ट साहित्य जसं मराठीत अनुवादित व्हायला हवं तसंच उत्कृष्ट मराठी साहित्यही सर्व भारतीय भाषात अनुवादित व्हायला हवं. तसं झाल्यास त्याला अधिक मोठा वाचकवर्ग लाभेल.

Hits: 641
X

Right Click

No right click