३६. १९५३ अहमदाबाद - वि. द. घाटे

 

ज्ञानेश्वर, तुकोबा व श्रीशिवछत्रपती ही जर जुनी त्रिमूर्ती तर महात्मा फुले, आगरकर, टिळक ही नवी त्रिमूर्ती. नवे वाङ्मय वास्तवाच्या जवळ आहे. ते जीवनाभिमुख असल्यामुळे त्यात विविधता व खोली आहे. जगाचा व मानवाचा खूप अनुभव असणे ही साहित्याला एवढी मोठी बाब नाही. तो अनुभव पचवून त्यावर चिंतन करून त्याला एकजीव करून तो कलात्मक माध्यमातून व्यक्त करणे हे अधिक महत्वाचे. लेखकांची कलेवर धार्मिक श्रद्धा पाहिजे. देवघरात मन शांत व संयत हवे व लघुरूद्रच करावयाचा असला तरी तो व्यवस्थितपणेच केला पाहिजे.

Hits: 1000
X

Right Click

No right click