मुंबई विद्यापीठ - माय मराठी प्रकल्प

Parent Category: ROOT Category: वार्तापत्र Written by सौ. शुभांगी रानडे

>Ref_ लोकसत्ता टीम -February 28, 2022 2:18:54 am

मुंबई : अमराठी भाषिकांना मराठी शिकता यावे, मराठी भाषेचे दरवाजे सर्वासाठी खुले व्हावेत यासाठीचा मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभागाच्या वतीने २०१२ मध्ये सुरू करण्यात आलेला ‘माय मराठी प्रकल्प’ अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. शासकीय धोरण राबविण्यासाठी आणि अंमलात आणण्यासाठी भरीव कामगीरी या प्रकल्पाने केली असल्याचे गौरवोद्गार मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी काढले.
मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभाग आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने माय मराठी प्रकल्पाअंतर्गत अन्यभाषकांसाठी मराठीच्या प्रावीण्य पातळय़ा २, ३, ४, ५,६ आणि विशिष्ट लक्ष्यगटांसाठी ४ लघु- अभ्यासक्रम आणि एपच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, प्र कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक संजय कृष्णाजी पाटील, मराठी भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

Hits: 410
X

Right Click

No right click