फ्रेंच भाषा

Parent Category: भाषांतर Category: परदेशी भाषा Written by सौ. शुभांगी रानडे

Following article is small part of language information article. Pleae refer to https://vishwakosh.marathi.gov.in for font images, complete article and info about literature in this language.

फ्रेंच ही पश्चिम यूरोपात बोलली जाणारी एक अत्यंत समृद्ध भाषा आहे . तिची अभिव्यक्ती क्षमता अतिशय श्रेष्ठ दर्जाची असून तिचे साहित्य जगातील सर्व श्रेष्ठ साहित्यांपैकी एक आहे . फ्रेंच भाषा फ्रान्सबाहेर बेल्जियम , स्वित्सर्लंड व लक्सेंबर्ग यांचा काही भाग आणि कॅनडाचे काही प्रांत यांत मातृभाषा म्हणून बोलली जाते . उत्तर आ फ्रिकेचा किनारी प्रदेश , इजिप्त , काँ गो , सिरीया , लेबानन , मादागास्कर इ . पू र्वी फ्रेंच साम्राज्यातल्या किंवा फ्रेंच वर्चस्वाखाली असलेल्या प्रदेशांतही सांस्कृतिक भाषा म्हणून तिची पकड आहे . भारतातही चंद्र नगर ( प . बंगाल ) , पाँ डिचेरी ( केंद्र शासित ) , यानाआँ व माहे ( केरळ ) या फ्रेंच वसाहतींत शिक्षण आणि राज्यकारभार यांत फ्रेंच भाषेचाच उपयोग केला जाई .

फ्रेंच भाषिकांची एकंदर संख्या आठ कोटींच्या वर आहे .इतिहास : फ्रेंच ही इंडो – यू रोपियन भाषा – कुटुं बाच्या लॅटिन शाखेची म्हणजे रोमा न्स बोली आहे . इ . स . पू . ५० च्या सुमाराला लॅटिनचा फ्रान्समध्ये प्रवेश झाला . सुरु वातीला सांस्कृती क पातळीवर तो शिक्षण , राज्यकारभार , न्यायदान या क्षेत्रांत झाला . ही ग्रांथिक प्रमाण लॅटिन होती . तीच पुढे ख्रिस्तीकरणानंतर धर्मभाषा म्हणूनही चालू राहि ली परंतु सैनिक , व्यापारी , कारागी र इ त्यादीं ची लौकिक लॅटिन बोली याचबरोबर सामान्य जनतेत पसरली आणि परिवर्तने होत होत तिला आजचे स्वरूप प्राप्त झाले .

फ्रेंचचा लिखि त पुरावा आठव्या शतकापासून सापडतो . तो काही लॅटिन व जर्मानिक शब्दांचा अर्थ देणाऱ्या शब्दांच्या स्वरूपात आहे . इ . स . ८४२ ची ‘ स्ट्रॅस्‌बर्गची शपथ ’ ही या भाषेची खरी सुरुवात म्हणता येईल . यानंतर धार्मिक व ऐतिहासिक स्वरूपाच्या लेखनातून नंतरचे फ्रेंच साहित्य जन्माला आले .

पण फ्रान्सच्या सर्व प्रदेशां तली बोली एकरूप नव्हती . तिची दक्षिणेकडील व उत्तरेकडील रूपे वेगळी असून ‘ होय ’ या अर्थाच्या प्रचलित असणाऱ्या शब्दावरून दक्षिण बोलीला ‘ ऑक ’ व उत्तर बोलीला ‘ ओइल ’ हे नाव होते .फ्रेंच भाषेला खरी प्रतिष्ठा १५३९ मध्ये मिळाली . या वर्षापासून राजाज्ञेने न्यायदानात आणि राज्यकारभारात तिचा वापर लॅटिन ऐवजी होऊ लागला . पंधराव्या शतकात छापण्याच्या कलेचा शोध लागलेला होता . त्यामुळे दरबारचे आदेश , न्यायदान , राज्यकारभाराचे कागदपत्र ज्या भाषेत छापून देशभर जाऊ लागले त्या राजधानीच्या म्हणजे पॅरिसच्या स्थानिक भाषेला प्रमाण भाषेचा दर्जा मिळाला .

विसाव्या शतकाच्या प्रारंभापर्यंत फ्रेंच ही यूरोपातील दरबार , सुसंस्कृत वर्ग इत्यादीं ची व्यवहारभाषा होती . आंतरराष्ट्रीय करारांत व वाटाघाटींत ती वापरली जाई . पहिल्या जागतिक युद्धानंतर हे आंतरराष्ट्रीय महत्त्व कमी होऊ लागले आणि अमेरिकेच्या राजकीय वर्चस्वामुळे आता तर ही जागा इंग्रजांनी घेतली आहे .

भाषिक वैशिष्ट्ये : ध्वनीविचारासंबंधी लिहिण्यापुर्वी लिपीचा परिचय करून घेणे सोयी चे ठरेल .

फ्रेंच भाषा लेखनासाठी रोमन लिपीचा वापर करते . ही लिपी अशी : a b c d e f g h i j (k) l m n o p q r s t u v (w) x y z, यांपैकी k व w ही अक्षरे काही परकी शब्दांतच आढळतात ( Kepi, wagon ) . यांशिवाय संवृत स्वरदर्शक ′ ( एग्यू ) , विवृत स्वरदर्शक ‵ ( ग्राव्ह ) आणि दीर्घत्वदर्शक ⋀ ( सिकौफ्ले क्स ) ही तीन आघातचिन्हे असून लागोपाठ येणारे स्वर वेगळे उच्चारले पाहिजेत हे दाखविणारे .. ( त्रेमा ) हे चिन्ह आहे ( उदा . , hais ए , पण ha ἴs आइ ).

वाक्यरचना : नाम क्रियापदापूर्वी येते : Guy parle ‘ गी बोलतो ’. कर्म सर्वनाम असल्यास क्रियापदापूर्वी येते : G uy lui parle ‘गी त्याच्याशी बोलतो ʼ . नाम असल्यास नंतर येते : Guy parle Marie ‘ गी मारीशी बोलतो ’. प्रत्यक्ष कर्म अप्रत्यक्ष कर्मापूर्वी येते : Guy donne le livre Marie ‘ गी पुस्तक मारीला देतो ’. बहुतेक विशेषणे नामानंतर येतात : Le monlin rouge ‘ लाल गिरणी ’, un Coeur simple ‘ निष्कपट मन ’. क्रियाविशेषण क्रियापदानंतर येते : il parle doucement ‘ तो हळू बोलतो ’ il marche vite ‘ तो भर भर चालतो ’. नकारार्थी क्रियापदापूर्वी ne व नंतर pas चा प्रयोग होतो : il ne marche pas vite ‘ तो भर भर चालत नाही ’. Marie n’aime pas Charles ‘ मारीला शार्ल आवडत नाही ’. पण rien personne, Jamais , इ . शब्दांबरोबर आणि काही थोड्या क्रियापदांबरोबर फक्त ne चाच वापर होतो : il ment ‘ तो खोटं बोलतो ’ il ne ment jamais ‘ तो कधीही खोट बोलत नाही ’. Je sais ‘ मला माहीत आहे ’ je ne sais ‘ मला माहीत नाही ’ je ne sais rien ‘ मला काहीही माहीत नाही ’.

प्रश्नवाचक रचना क्रियापद कर्त्यापूर्वी ठेवून होते : il ment ‘ तो खोट बोलतो ’ ment-il? ‘ तो खोटं बोलतो का ’? याशिवाय स्थल , काल व रीतिदर्शक प्रश्नवाचक अव्यये ही आहेत : Ou’ est-il ? ‘ तो कुठे आहे ?’ Quand partirez vous ? ‘ तुम्ही केव्हा निघणार ?’ त्याचप्रमाणे इतर प्रश्न वाचक शब्दही आहेत : Qui est cet homme ? ‘ हा माणुस कोण आहे ?’ Quel est votre pays ? ‘ तुमचा देश कोणता ?’ ज्या प्रश्नाचे उत्तर ‘ हो ’ किंवा ‘ नाही ’ हे असते तो विधानापूर्वी Est-ce que हे शब्द ठेवून बनविता येतो : I 1 est malade . ‘ तो आजारी आहे ’. Est-ce qu’il est malade ‘ तो आजारी आहे का ?’

संदर्भ : 1. Brunot, F. F. Brunean, C. Grammaire Historique de la Langue . Paris, 1937 .

2. Gaiffe, S. F. and others, Grammaire Larousse du xxe, Paris, 1936 .

कालेलकर , ना . गो .

Hits: 416
X

Right Click

No right click