सखी परिवार प्रवर्तक श्री. विजय वसंत अमृतकर

Parent Category: मराठी उद्योग Category: स्वदेशी उद्योग प्रेरक Written by सौ. शुभांगी रानडे


सखी परिवार प्रवर्तक श्री. विजय वसंत अमृतकर यांचा परिचय

नाव : विजय वसंत अमृतकर
जन्म : दिनांक : ७/१०/१९६२
शिक्षण: वाणिज्य शाखेतून पदवीधर
व्यवसाय : राज्य शासकीय कर्मचारी
प्रशासकीय अधिकारी, या पदावरून सेवानिवृत्त (मुंबई पोलीस दल)
भाषा: मराठी,हिंदी,गुजराथी व इंग्लिश
पत्ता: २४/१८ गोविंद नगर ,बोरिवली मुंबई ४०००९२
मूळ राहणार पेठ तरवाडे,चाळीसगाव
खान्देश

वडील कै वसंत महादू वाणी पुरातत्व विभागात कार्यरत असल्याने
बालपण दौलताबाद किल्ला, वेरुळलेणी , औरंगाबाद ,कान्हेरी , व घारापुरी लेणी येथे गेले.
२ वर्ष ओतूर येथे शिक्षण
सन १९७१ मुंबई येथे आलो
वडिलांमुळे अनेक धार्मिक स्थळे, ऐतिहासिक स्थळे येथे फिरणे झाले
संत गोंदवलेकर महाराज , गोंदवले उत्सव येथे सण १९८२ पासून वडिलां सोबत जाण्यास सुरवात व आजतगायत प्रथा सुरू
MPSC परीक्षेत उत्तीर्ण सण १९८५ पासून प्रशासकीय सेवेत दाखल
सन २०२० साली प्रशासकीय अधिकारी या पदावरून सेवानिवृत्त
सामाजिक कार्याची आवड विविध संस्थेत सहभाग
👉समर्थ सेवा संघ माध्यमातून समर्थ रामदास स्वामी यांची सेवा
पुस्तक प्रकाशनाचा छंद
संस्कार धारा, समर्थ व मनाचे श्लोक, देशभक्तीपर गीताचे ,पुस्तक, संत सेवागिरी महाराज यांचे चरित्र असे अनेक पुस्तक प्रकाशित

मार्कंडेय ऋषी सेवा संघ या माध्यमातून मार्कंडेय पर्वत परिसरात सामाजिक कार्य

सन २०१४ पासून लाडशाखीय वाणी समाजातील भगिनींचे एकत्रीकरण
त्यातून सखी परिवार निर्मिती
३ जुलै २०१६ रोजी नासिक येथे सखी सखी स्नेह संमेलनाचे आयोजन


३१मे रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती उत्सव ऑनलाईन साजरा केला हा उपक्रम विविध माध्यमातून ५लक्ष लोकांन पर्यंत पोहचवला
सामाजिक कार्य : सखी परिवार प्रवर्तक व्हाट्सएपच्या माध्यमातून १०,००० भगिनींचे एकत्रीकरण केले असून त्यातून व्यवसाय निर्मिती
सखी पैठणी साडी निर्मिती व्यवसायात पदार्पण केले आहे
विविध व्यवसाय भगिनी करत असून त्यांना या माध्यमातून मार्केट मिळवून देणे हा हेतू आहे त्यास प्रतिसादही मिळत आहे

Hits: 1139
X

Right Click

No right click