पलिकडले

Parent Category: मराठी पुस्तके Category: काव्यदीप पुस्तक - ७.इतर


पूजा-अर्चा मंदिर-मूर्ती
यांच्याही पलिकडे असते
देवाचे देवपण ---- १

खिडक्या-दारे माती-भिंती
यांच्याही पलिकडे असते
घराचे घरपण ---- २

नाक-डोळे रंग-रूप
यांच्याही पलिकडे असते
माणसाचे माणूसपण ---- ३

रांधा-वाढा उष्टी-काढा
यांच्याही पलिकडे असते
गृहिणींचे अंगण ---- ४

कपडा-लत्ता दाग-दागिने
यांच्याही पलिकडे असते
स्त्रीचे आईपण ---- ५

Hits: 401
X

Right Click

No right click