दीपावली

Parent Category: मराठी पुस्तके Category: काव्यदीप पुस्तक - ५.प्रासंगिक

काय वर्णू बाई दिवाळीचा थाट
आनंदाची करी सदा बरसात ---- १

कृष्णदेव दावी नरकासुरा वाट
स्नानाची गर्दी होई होता पहाट ---- २

पणतीरूपी चांदण्याही येता दारात
प्रकाशाने ऊजळे सारा आसमंत ---- ३

लक्ष्मीपूजनाचा मोठा थाटमाट
सारे जन गाती धनश्रीचे गीत ---- ४

सुख भरुनी राहे घरादारात
आनंदाने झुलती सारे मजेत ---- ५

भाऊबीज येई मोठ्या झोकात
डोळियांच्या ज्योती लावुनी दारात ---- ६

सणांच्या राजाची चालता वरात
आनंदाने आसवे येती नयनात ---- ७

Hits: 425
X

Right Click

No right click