आज्जी ग आज्जी

Parent Category: मराठी पुस्तके Category: काव्यदीप पुस्तक - ३.बाल

आज्जी ग आज्जी
तू लाडकी ना माझी
गोष्ट मला सांग तू
छान चिऊकाऊची ---- १

आज्जी ग आज्जी
तू लाडकी ना माझी
चिऊकाऊची शाळा
असते तरी कुठची? ---- २

आज्जी ग आज्जी
तू लाडकी ना माझी
चिऊकाऊच्या या डब्यात
असते का पोळीभाजी? ---- ३

आज्जी ग आज्जी
तू लाडकी ना माझी
चिऊकाऊला असतात का
आज्जी नि बिज्जी ---- ४

Hits: 412
X

Right Click

No right click