निष्काम काम

Parent Category: मराठी पुस्तके Category: सांगावा कवितासंग्रह

निष्काम काम

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन हे भगवद्गीतेतले सुप्रसिद्ध वचन सर्वांना ठाऊक आहेच. फळाची अपेक्षा न धरता जो मनुष्य आपले कर्तव्यकर्म योग्य रीतीने पार पाडतो त्याला एक ना एक दिवस देव भेटतोच. त्याच्या मनाला समाधान मिळते व शांतता लाभते.

स्मरा स्मरा तुम्ही देवासी
दिसे न जरि तो नयनासी
पुसापुशी ना करा कधी
निरखुनि बघता मनामधी . . . . ।।१ ।।

धीर धरा तुम्ही परि चित्ती
चळो न द्यावी अपुली मति
येई प्रभाती वा राती
मदतीला तो रमापती . . . . ।।२ ।।

पापंाच्या त्या जरि राशी
ठाऊक नाही कशी काशी
जळूनि जाती क्षणमाजी
प्रेमे स्मरता हृषिकेशी . . . .।।३ ।।

मोह नि माया ना धरिती
निष्कामे जे कृति करिती
रात्रंदिन परि प्रभु स्मरती
त्या सहजचि भेटे रघुपती . . . . ।।४ ।।

Hits: 355
X

Right Click

No right click