मांढरदेवी

Parent Category: मराठी पुस्तके Category: सांगावा कवितासंग्रह

मांढरदेवी

वाई येथील मांढरदेवीच्या यात्रेप्रसंगी जी दुर्घटना घडली त्या पार्श्वभूमीवर लिहिलेली कविता. कल्पना अशी की स्वत: मांढरदेवीच प्रकट होऊन तिचे विचार सांगत आहे. कोंबड्या-बकऱ्यांच्या बळीची ती भुकेली नाही तर भक्तिभावाने अर्पण केलेल्या भाजीभाकरीची ती भुकेली आहे. दोन हात जोडून मनापासून केलेला नमस्कार तिला अधिक आवडतो.

स्वप्नी एकदा आली माझिया, वाईची मांढरदेवी
म्हणे साऱ्यांना सांग सखे, गाऊनी माझी ओवी . . . १

हिरवी साडीचोळी ल्यायिली, गोडवा वदनी
हिरवा चुडा नि कपाळी कुंकू दिसे समाधानी . . . २

गौरवर्ण नि मोहक मुद्रा, नाक चाफेकळी
बोलके वदन हसरे नयन, गाली गोड खळी . . . ३

नयनी आणू सदा तियेची, प्रसन्नशी मूर्ती
घाईगर्दी नि धक्काबुक्की, नसे ही खरी भक्ती . . . ४

करू जोडून हात दोन, नमन तिजप्रती
मागणे मागू मनापासून, नको चुकीच्या रीती . . . ५

कोंबडी बकरी आवडे न तिला, साधी गौरीपरी
गरिबाघरची बरी म्हणते, भाजी नि भाकरी . . . ६

Hits: 376
X

Right Click

No right click