दीपज्योती

Parent Category: मराठी पुस्तके Category: सांगावा कवितासंग्रह

दीपज्योती

चैत्रगौरीच्या हळदकुंकू प्रसंगी हौसेने आरास केली जाते. यावेळी विविध प्रकारच्या दिव्यांची योजना केली होती असंख्य पणत्या, समया साध्या, विजेच्या, तरंगत्या मेणबत्त्या इत्यादी. जणू दीपोत्सवच केला होता.

आकाशीच्या असती तारका नच ह्या दीपज्योती
हळदकुंकू घेण्या येती उतरुनी धरतीवरती . . . १

तेजफुले जणू गगनामधली नच ह्या दीपज्योती
चंदेरी जणू हिमकण येती अवचित अवनीवरती . . . २

बकुलफुलांची जणू ही माला चैत्रगौरीच्यासाठी
मयूरपिच्छावरील लाखो डोळे लखलख करिती . . .३

मौक्तिकमालेतून गौरीच्या ओघळती जणू मोती
गर्भरेशमी पदरावरची सोनफुले चमचमती . . . ४

चैत्रगौरीच्या करिती पूजना लेऊनी भरजरी वसना
सण हा करिती चैत्रमासी हर्षभरित त्या ललना . . . ५

Hits: 337
X

Right Click

No right click